Jalgaon News : मोठा वाघोदा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण; 20 ते 22 ग्रामस्थांवर उपचार सुरू

Jalgaon : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दूषित पाण्यामुळे ‘गॅस्ट्रो’सदृश आजाराची लागण झाल्याची घटना घडली आहे.
When transferring patients for treatment with gastro-like infection.
When transferring patients for treatment with gastro-like infection.esakal
Updated on

Jalgaon News : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दूषित पाण्यामुळे ‘गॅस्ट्रो’सदृश आजाराची लागण झाल्याची घटना घडली आहे. वाघोदा येथील २० ते २२ जणांवर सावदा येथील वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत तर निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी डॉ. चंदन पाटील, मोठा वाघोदा आरोग्य केंद्रात आरोग्य वैद्यकीय सीएचओ, आरोग्य सहाय्यक यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले. काहींवर उपचार सुरू आहेत. ( Outbreak of Gastro like Disease in Waghoda village )

वाघोदा गावातील गणेशनगर, आंबेडकर नगर, मोठा वाडा, बेघर वस्ती, रमाई नगर या भागातील रुग्णांना उलट्या, मळमळ व अतिसाराची लक्षणे दिसल्याने व रुग्ण वाढल्याने हा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असली तरी सकाळी दहाला भ्रमणध्वनीवरून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र असला कुठलाही प्रकार वाघोदा गावात नसल्याचे सांगितले.

दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांना ही लक्षणे जाणवत असल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज खासगी डॉक्टरांकडून वर्तवला गेला. मात्र प्रत्येक भागातून असे रुग्ण आढळल्याने व रुग्ण वाढल्याने दुपारी तीनला प्राथमिक वैद्यकीय अधिकारी यांचा ताफा हजर झाला व त्यांनी सर्व आरोग्य सेवक व ग्रामपंचायतींकडून संपूर्ण माहिती घेतली व गावात पाणी तपासणीच्या सूचना दिल्या.

तेव्हापासून आरोग्य केंद्रात गावातील गॅस्ट्रोसदृश आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करणे सुरू असून, पाण्याची ओटीए तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. येथे सोयीसुविधा व औषधी उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना निंभोरा रुग्णालयात पाठविण्यात आले. वाघोदा आरोग्य केंद्रात जागा नसल्याचे रुग्णांसाठी मंडप, गादीची तत्काळ व्यवस्था करण्यात आली. कुणालाही गॅस्ट्रोसदृश लक्षणे आढळल्यास त्वरित वाघोदा येथील उपआरोग्य आयव्ही व औषधोपचार उपलब्ध असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. (latest marathi news)

When transferring patients for treatment with gastro-like infection.
Jalgaon News : ‘एचटीबीटी’ची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

या वेळी वाघोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. धापटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाभळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय रिंढे डॉ. सचिन ठाकूर लोहारा, डॉ. नीरज पाटील चिनावल, आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगीर, तालुका आरोग्य सहाय्यक राजेश खैरनार यांनी भेट दिल्या व सर्व माहिती घेऊन सूचना दिल्या तसेच शेजारचे प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथील कर्मचारी आरोग्य सहाय्यक एम. ए. पवार आरोग्य निरीक्षक सी. व्ही. पाटील, आरोग्य सेवक चंद्रकांत चौधरी, कैलास महाजन, डी. के. नमायते, खुशाल सुरजागडे, कैलास सरोदे, सुभाष ठाकूर, जीवन सोनवणे, शुभम महाजन, तुषार महाजन, प्रशांत नरवाडे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग हे सहकार्य करीत होते.

आमदार चंद्रकांत पाटील, रावेर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायकळ यांच्यासह निंभोरा, चिनावल, ऐनपूरसह तालुक्यातील पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी पं. स. आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांनी पाहणी केली.

When transferring patients for treatment with gastro-like infection.
Jalgaon News : वृक्षांविना बोडका दिसतोय राष्ट्रीय महामार्ग! भुसावळ तालुक्यातील महामार्ग आजही वृक्षारोपणाच्या प्रतीक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.