CM In Jalgaon : पाचोरा रस्त्याच्या दुर्दशेने मुख्यमंत्र्यांचा हवाई प्रवास; जळगाव- चाळीसगाव रस्ता पूर्ण होईना

Road Construction
Road Constructionesakal
Updated on

CM In Jalgaon : मुख्यमंत्र्यांच्या पाचोरा दौऱ्यात जळगाव- पाचोरा या अवघ्या ५० किलोमीटरच्या अंतरासाठी त्यांना हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागणार आहे. अर्थात त्याचे कारणही तसेच आहे... ते म्हणजे जळगाव ते पाचोऱ्यापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा.

सहा- सात वर्षांपासून जळगाव-पाचोरा-चाळीसगाव या रस्त्याचे काम सुरु होऊनही ते पूर्ण न झाल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकरीचे झालेय. म्हणूनच या काही मिनिटांच्या प्रवासासाठी मुख्यमंत्र्यांना चॉपरच वापरावे लागणार आहे. (Jalgaon Pachora distance of 50 km cm shinde have to be traveled by helicopter news)

जळगाव- पाचोरा- भडगाव- चाळीसगाव या राज्यमार्ग क्रमांक १९चे २०१६-१७मध्ये राष्ट्रीय मार्ग क्रमांक ७५३-जे असे रूपांतर करून हा रस्ता थेट नांदगाव- मनमाड- चांदवडपर्यंत मंजूर करण्यात आला. केंद्र सरकारमधील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाला जवळपास साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. रस्त्याचे काम जोमाने सुरुही झाले.

सहा वर्षांत पूर्ण झालाच नाही

रस्त्याच्या कामाला सुरवात होऊन सहा वर्षे झाली, तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. जळगावपासून पाचोऱ्यापर्यंत व पुढे भडगाव- चाळीसगावपर्यंत अनेक वळणाच्या ठिकाणी या ऱस्त्याचे काम झालेले नाही. जळगाव- पाचोरा टप्प्यात वावडद्याच्या पुढे नांद्रा गावापर्यंत रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालीय. चारचाकी काय, दुचाकी चालविणेही या रस्त्यावरुन कठीण होऊन बसलेय.

भूसंपादनाचा प्रश्‍न कायम

याबाबत अधिक माहिती घेतली असता, वळणांच्या ठिकाणी या रस्त्याचे काम अपूर्ण राहण्याचे कारण भूसंपादनाचा प्रलंबित प्रश्‍न आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न कायम असून, त्यावर तोडगा निघत नसल्याचे सांगितले जातेय. अलिकडेच त्यासाठी ९ कोटींचा निधी आला. संबंधितांना नोटिसा बजावून प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Road Construction
CM Shinde In Jalgaon : मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी पाचोऱ्यात; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

काम कधी होणार?

या रस्त्याचे काम रखडल्याने मुख्यमंत्री शिंदेंना मंगळवारी (ता. १२) जळगाव- पाचोरा हवाई प्रवास करावा लागणार आहे. दुर्दशा झालेल्या रस्त्यावरुन मुख्यमंत्र्यांचे वाहन कसे न्यायचे, हा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाल्याने हा पर्याय उपयोगात आणला जाणार आहे. मात्र, या रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल, हा प्रश्‍नच आहे.

पाचोऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थ‍ितीत पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. पाचोरा येथून जळगांव- चाळीसगांव ते चांदवड हा राज्य मार्ग गेला असून, कार्यक्रमाच्या दिवशी मंगळवारी (ता. १२) जळगाव येथून पाचोरामार्गे चाळीसगावकडे जाणारी अवजड वाहने पर्यायी मार्गावरुन वळविण्यात येतील.

याबाबत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहेत. अवजड वाहनांनी मंगळवारी सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत जळगांव- एरंडोल- कासोदा- भडगावमार्गे चाळीसगावकडे जावे. तर, चाळीसगाव येथून पाचोरामार्गे जळगावकडे जाणारी अवजड वाहने भडगांव- कासोदा एरंडोलमार्गे जळगावकडे जातील.

Road Construction
CM Eknath Shinde : निजामकाळातील नोंदींनुसार कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.