जळगाव : जळगाव-पाचोरा रस्त्यावरील शिरसोली गावातील आकाशवाणी टॉवरजवळ गुरुवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात विटनेर गावातील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. कांतिलाल ऊर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) आणि रवींद्र किसन चव्हाण (३०) अशी मृतांची नावे आहेत. हा ‘हीट ॲन्ड रन’चा प्रकार असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. (accident Car collides with two wheeler in 2 dead )
कांतिलाल राठोड व रवींद्र चव्हाण हे दोघे दुचाकी (एमएच १९, इएल ३११) वरून शिरसोलीकडून जळगावकडे येत होते. शिरसोलीजवळील आकाशवाणी टॉवरसमोरून सुसाट येणाऱ्या कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती, की दुचाकीच्या पुढील चाकाचा स्फोट होऊन दोन्ही शॉकअप तुटले. या अपघातात दुचाकीवरील कांतिलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण जागीच ठार झाले. शिरसोली ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत दोन्ही दुचाकीस्वारांना तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले.
तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच विटनेर ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी आक्रोश केला. मृत कांतिलाल याच्यामागे आई, मोठा भाऊ, तर रवींद्र चव्हाण यांच्यामागे पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे. अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कारचालक फरारी
अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा कारचालक न थांबता फरारी झाला. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
काँक्रिट रोडने केला घात
जळगाव-पाचोरा रस्त्यावर तब्बल ७५ लहान-मोठी वळणे आहेत. या रस्त्याचे गेल्या वर्षीच काँक्रिटीकरण झाले आहे. परिणामी, रस्त्यावरील गतीवर नियंत्रण राखणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील प्रत्येक वळण गाव-खेड्यातून असल्याने बहुतांश ठिकाणी ग्रामस्थांनी गतिरोधक टाकले आहेत. तरी सुसाट कारचालकांच्या वेगावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.