Jalgaon Road Damage : पारोळा-अमळनेर रस्त्याची चाळण! बससह दुचाकींचा चिखलातून प्रवास

Jalgaon News : पारोळा येथील पारोळा ते अमळनेर रस्ता बायपासपर्यंत खड्डेमय झाला असून, व्यंकटेशनगर परिसरात रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत.
Jalgaon Road Damage
Jalgaon Road Damageesakal
Updated on

पारोळा : येथील पारोळा ते अमळनेर रस्ता बायपासपर्यंत खड्डेमय झाला असून, व्यंकटेशनगर परिसरात रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, अनेक शाळकरी विद्यार्थी रस्ता चुकविण्याच्या नादात रस्त्यावर पडल्याच्या घटना घडत असून, पालकांसह स्थानिक रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (Parola Amalner road damaged)

येथील राज्य क्रमांक एक म्हणून ओळखला जाणारा पारोळा- अमळनेर रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्येमय अवस्थेत आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर डबके साचत असल्यामुळे ये- जा करणाऱ्या चारचाकी, दुचाकींसह बस वेगाने जात असल्यामुळे अनेक पायी चालणाऱ्या नागरिकांवर साचलेले पाणी अंगावर उडत असल्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

पारोळा-अमळनेर रस्त्यातून रोजच शेकडो वाहने ये-जा करीत असतात. त्यातच या मार्गालगत अनेक शैक्षणिक संस्था असल्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. मात्र सदर रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविणे किंबहुना सायकल चालविणे जिकरीचे झाले आहे. (latest marathi news)

Jalgaon Road Damage
Jalgaon Road Damage : कजगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प! खड्ड्यांमध्ये अडकले वाहन

दरम्यान, अनेकदा सामाजिक संघटनांनी संबंधित विभागाला या समस्येबाबत तोंडी अथवा संपर्क साधून माहिती कळविली आहे. मात्र, संबंधित विभागाकडून काम मंजूर झाले असून.

लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.रस्त्याचे काम तत्काळ सुरू व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांसह वाहन चालक व शाळकरी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Jalgaon Road Damage
Jalgaon Political: तिजोरीत खडखडाट अन्‌ घोषणांचा पाऊस : प्रदेशाध्यक्ष पाटील यांची टीका; NCP (शरदचंद्र पवार) पक्षाचा मेळावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.