Jalgaon News : पारोळा गुन्हेगार सुनील पाटील नागपूर कारागृहात स्थानबद्ध

Jalgaon News : विविध गुन्हे दाखल असलेला सुनील लक्ष्मण पाटील ऊर्फ सल्ल्या (वय ३९, रा. अमळनेर रोड, पारोळा) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
crime
crimesakal
Updated on

पारोळा : विविध गुन्हे दाखल असलेला सुनील लक्ष्मण पाटील ऊर्फ सल्ल्या (वय ३९, रा. अमळनेर रोड, पारोळा) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनील यास नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले, अशी माहिती येथील पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. सुनील ऊर्फ सल्ल्या याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Parola criminal Sunil Patil lodged in Nagpur Jail )

तो लहानपणापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याने पारोळा शहरात व परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती व दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर कायद्याचा धाक राहावा व त्याच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी, याकरिता जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार, चाळीसगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर दाखल गुन्ह्यांच्या आधारे ‘एमपीडीए’अंतर्गत प्रस्ताव तयार केला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

crime
Jalgaon News : बळीराजा पुन्हा KYC साठी घामाघूम! कपाशी, सोयाबीन अनुदानासाठी हेलपाटे; निर्णयामुळे मनस्ताप

गेल्या २७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी सुनील ऊर्फ सल्ल्या यास ‘एमपीडीए’नुसार धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यानुसार सुनीलला ४ ऑक्टोबरला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पारोळा येथील पोलिस निरीक्षक सुनील पवार, पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी, सुनील हटकर, विजय पाटील, आशिष गायकवाड, महेंद्र पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील दामोदरे यांनी ही कारवाई केली.

crime
Jalgaon News : शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनासाठी 11 कोटी 88 लाख 64 हजार मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.