Jalgaon Electricity Supply : पारोळ्याची वीज व्यवस्था 12 कर्मचाऱ्यांवर! पूर्वपावसाळी कामांसोबत वाढीव मनुष्यबळाची गरज

Jalgaon News : अनेकदा रात्री अपरात्री अभियंत्यांसह लाईनमनला पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करावे लागते. कालौघात त्यात वाढही झालेली नाही.
Electricity Supply
Electricity Supplyesakal
Updated on

पारोळा : राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या पारोळा शहरात ११ हजार महावितरणाचे वीज ग्राहक आहेत. तीन फीडर मिळून शहराचा वीज प्रवाह सुरू आहे. शहराचा विस्तार आणि वीजेची मागणी वाढत असताना शहरासाठी जेमतेम १२ कर्मचाऱ्यांवर वितरणाची व्यवस्था उभी आहे.

पारोळा शहराला २५ एम व्ही ए वीज लागते.यातून वीज ग्राहक व व्यावसायिकांना विजेचा पुरवठा केला जातो. अनेकदा रात्री अपरात्री अभियंत्यांसह लाईनमनला पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करावे लागते. कालौघात त्यात वाढही झालेली नाही. (Jalgaon Parola electricity system on 12 employees news)

वीजव्यवस्थेचे जाळे

पारोळा शहराचे वीज व्यवस्थेचे जाळे तीन फिडरवर चालते. त्यात, झपाट भवानी फिडर, शनी मंदिर ते राम मंदिर चौक कुरेशी मोडला ते झपाट भवानी आजाद चौक ते दिल्ली दरवाजा गोंधळ वाडा मोठा महादेव चौक राजीव गांधी नगर इंदिरा गांधी नगर शांतिनाथ बँक गुजराती गल्ली बाजारपेठ तलाव गल्ली, नगरपालिका कजगाव रोड तांबे नगर महावीर नगर सिद्धिविनायक पार्कला पुरवठा होतो.

बीएसएनएल फिडरहून अशोक नगर धरणगाव चौफुली बीएसएनएल ऑफिस संत गुलाब बाबा कॉलनी साने गुरुजी कॉलनी तहसील कार्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था के आर पाटील नगरला होतो तर पारोळा अर्बन फीडरवरुन शनी मंदिर चौक, पारधी वाडा, पार गल्ली राणी लक्ष्मीबाई नगर अंमळनेर रोड स्मशानभूमी उंदीर खरा रोड ममता हॉटेल वर्धमान नगर डीडी नगर एक, डी.डी नगर दोन, न्यू बालाजी नगर यांचा समावेश आहे. (latest marathi news)

Electricity Supply
Mini Solar Panel : कडाक्याच्या उन्हात लाईट बिल च टेन्शन नाही ; वापरा घरच्या घरी विज बनवणारं 'हे' उपकरण

शासकीय कार्यालयात वीज वापर (युनिटमध्ये)

शासकीय कार्यालयाचे नाव महिन्याचा वापर एका दिवसाचा वापर

पोलिस स्टेशन ९०० ३०

दिवाणी व फौजदारी न्यायालय ८०० २६

तालुका कृषी कार्यालय १५० ५

कुटीर रुग्णालय १५०० ५०

तहसील कार्यालय ५०० १६

पंचायत समिती ४०० १३

भूमी अभिलेख २०० ६

औद्योगिक प्रशिक्षण संस्था ४५० १५

गट संसाधन केंद्र १०० ३

बालविकास प्रकल्प विभाग ७० २

पूर्वपावसाळी कामांना वेग

दरम्यान अनेकदा नैसर्गिक वादळामुळे विजेचे तार तुटतात. त्यामुळे पर्यायाने संपूर्ण फिडर बंद करावे लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण कडून तारांवर लोंबकळणाऱ्या फांद्या यांची छाटणी सुरू आहे.१२ जणांवर शहराचा वीज वितरणाचा कारभार सुरू असून नियमित वीज देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असते. मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर विजेच्या दुर्घटना आणि वीज जाण्याचे प्रकार वाढत असताना कर्मचारी वाढही गरजेची आहे.

Electricity Supply
NP Singh: एनपी सिंग यांनी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या एमडी आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा; काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.