Jalgaon News : पारोळा खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी केंद्र‌ चालकांना सूचना

Jalgaon News : तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक झाली.
While guiding the meeting, Tehsildar Dr. Ulhas Deore. Neighbors Agriculture Officer Dattatreya Dhamale and officials.
While guiding the meeting, Tehsildar Dr. Ulhas Deore. Neighbors Agriculture Officer Dattatreya Dhamale and officials.esakal
Updated on

पारोळा : येथील तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक झाली. यात कृषी विभागासह अन्य विभागांच्या समन्वयाने खरीप हंगाम २०२४ साठी हंगामपूर्व आढावा घेऊन नियोजन करण्यात आले. बैठकीस गटविकास अधिकारी के. डी. शिंदे. (Jalgaon Parola Kharif Pre Season Planning Meeting Notice to Agriculture Center Operators)

जलसंधारण विभागाचे उपअभियंता टी. जे. राजवाडे, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण एम. बी. कापुरे, वन विभागाचे सुभाष पाटील, तालुका विकास अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा व सर्व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी कृषी विभागामार्फत मागील वर्षी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.

तसेच खरीप २०२४ हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे नियोजन सादर केले. कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी तालुक्यातील प्रमुख पेरणी क्षेत्र व त्या साठी आवश्यक बियाणे व खतांची मागणी व आवंटन पुरवठा बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तालुका स्तरावर खते, बियाणे व किटकनाशके गुण नियंत्रणासाठी भरारी पथके नियंत्रण कक्ष पंचायत समिती येथे स्थापन केल्याबाबत माहिती दिली. (Latest Marathi News)

While guiding the meeting, Tehsildar Dr. Ulhas Deore. Neighbors Agriculture Officer Dattatreya Dhamale and officials.
Jalgaon News : चोपड्याला 27 हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी; तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

बैठकीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक बियाणे खते व किटकनाशके यांचे वेळेत पुरवठा होईल व शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, या बाबत दक्षता घेणे बाबत सूचना दिल्या. वन विभाग, जलसंधारण विभाग व इतर संलग्न विभाग त्याचे खरीप हंगामातील नियोजन सादर केले.

कृषी निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी व कापूस जीनिंग मील प्रतिनिधी यांना बोंडअळी व्यवस्थापनाबाबत करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती देऊन त्या प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आश्वासित केले. पंचायत समिती कृषी अधिकारी दिनेश कोते यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख व अध्यक्षांचे आभार मानले.

While guiding the meeting, Tehsildar Dr. Ulhas Deore. Neighbors Agriculture Officer Dattatreya Dhamale and officials.
Jalgaon News : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी 16 भरारी पथकांची स्थापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.