Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग रावेर मधून'च जाणे अवघडच; तज्ञांचे मत

Jalgaon : राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग पुन्हा बदलणे अशक्य नसले तरीही कठीण असल्याची प्रतिक्रिया भूसंपादनाचे काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली आहे.
 National Highway (file photo)
National Highway (file photo)esakal
Updated on

Jalgaon News : केंद्र सरकारच्या सडक आणि परिवहन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील नियोजित राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग पुन्हा बदलणे अशक्य नसले तरीही कठीण असल्याची प्रतिक्रिया भूसंपादनाचे काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली आहे. केंद्र शासनाच्या राजपत्रात म्हणजे गॅझेट मध्ये प्रसिद्ध झालेल्या मार्गानेच हा नियोजित महामार्ग जाईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Jalgaon Passing through National Highway Raver is difficult Expert opinion)

तळोदा बऱ्हाणपूर हा २४० किलोमीटरचा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून जाईल असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले असले तरीही सामान्यपणे एकदा या मंत्रालयाने निश्चित केलेला मार्ग याआधी कधी बदलल्याचे उदाहरण नाही.

न्यायालयीन प्रक्रिया राबवून किंवा थेट केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्तिगत लक्ष घातले तरच या राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलू शकतो असे त्यांनी सांगितले. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भूसंपादनाचे काम करणाऱ्या कायदे तज्ज्ञांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नागरिकांत संभ्रम

एकीकडे संबंधित मंत्रालयाने जाहीर केलेले राजपत्र आणि दुसरीकडे खासदार खडसे यांनी केलेला दावा यामुळे या भागातील नागरिक व शेतकरीही द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळने या दोन तज्ज्ञांची मते जाणून घेतली. भू संपादनाच्या पुस्तकाचा आधार घेत त्यांनी हा दावा केला आहे. (latest marathi news)

 National Highway (file photo)
Jalgaon News : जिल्हा शिक्षक पतपेढीची होणार चौकशी; वसतिगृह, अन्य प्रकरणात गैरव्यवहार

या मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले राजपत्र हाच भूसंपादन कायद्याच्या ३-अ या उपनियमाचा अर्थ असल्याचेही तज्ज्ञांनी लक्षात आणून दिले. यानंतर आगामी १५ दिवस ते ३ महिन्याच्या आत हा राष्ट्रीय महामार्ग नियोजित गावांच्या कोणकोणत्या गट क्रमांकाच्या शेती शिवारातून जातो हेही स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असेल किंवा लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपलेलीही असेल अशीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

स्थगितीनंतर राजपत्र

२३ जानेवारीला या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या सर्वेक्षण व अन्य कामांना स्थगिती देण्याची शिफारस केल्यानंतर सव्वा महिन्यांनी म्हणजे २९ फेब्रुवारीला हे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे, याचा अर्थ या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही स्थगितीची शिफारस स्वीकारली नाही असाही होत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

अर्थात नियोजित राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलणे अशक्य नाही, पण लवकरच सुरू होणारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्यात राजकीय नेत्यांची व्यस्तता व त्यासाठी करावा लागणारा सततचा पाठपुरावा पाहता महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जाणे जवळपास निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

 National Highway (file photo)
Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातून महामार्ग नेण्यास विरोध; अंतुर्लीच्या शेतकऱ्यांची भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.