Jalgaon News : सरकारी योजनांचे पैसे लवकरच लाभार्थ्यांना ‘युपीआय’मार्फत!

Jalgaon : कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारत वेगाने पाऊल टाकत आहे. केवळ शहर, निम्न शहरमध्येच याची चलती आहे.
upi
upiesakal
Updated on

Jalgaon News : कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारत वेगाने पाऊल टाकत आहे. केवळ शहर, निम्न शहरमध्येच याची चलती आहे. ग्रामीण भागात पाहिजे तसा युपीआयचा वापर होताना दिसत नाही. यावर तोडगा म्हणून आता शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी ‘आरबीआय’ आता ‘डीबीटी’ लाभार्थ्यांना ‘युपीआय’शी जोडण्याचा विचारात आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना बँकेत जाऊन रक्कम काढण्याची गरज भासणार नाहीत. ( Payment of government schemes will soon be made available to beneficiaries through UPI )

ते युपीआयच्या माध्यमातून थेट रक्कम हस्तांतरीत व डिजिटल व्यवहार करू शकतील. त्यामुळे ग्रामीण भागातही कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाने भारतातील खेड्यांत युपीआय पेमेंट सेवा लोकप्रिय करण्यासाठी स्थानिक बँकांना युपीआय इकोसिस्टिम आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. एनपीसीआय सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका व इतर बँकांना युपीआयसोबत जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

त्यासाठी या बँकांना तंत्रज्ञानाची मदत करण्यात येणार आहे. सर्वत्र तंत्रज्ञानाची मदत देण्यात येणार आहे. स्थानिक व्यापारी, दुकानदार यांच्यामार्फत एक युपीआय इकोसिस्टिम वाढीवर भर देण्यात येणार आहे. सध्यास्थितीत ७०० स्थानिक बँकांसोबत काम सुरू झाले आहे. यामधील २४२ साठी त्यांनी युपीआय पेमेंट सिस्टिम सक्रिय केली आहे. (latest marathi news)

upi
Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

देशात जवळपास ३०० दशलक्ष सक्रिय युपीआय युझर्स आहेत. ग्रामीण भागातील मोठी लोकसंख्या युपीआयपासून दूर आहे. त्यांना या परिघात आणण्यासाठी मोबाईल बँकिंगसाठी स्थानिक बँकांनी आरबीआयकडे परवानगी मागितली आहे.

हा परीघ वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ज्या शासकीय योजना राबविल्या जातात. त्यांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे धोरण गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. हा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो. आता हा निधी लाभार्थ्यांना युपीआय देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

upi
Jalgaon News : चिनावल येथील परिस्थिती नियंत्रणात! पुढील 2 दिवस संचारबंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.