Jalgaon News : वाहतुकीचा खोळंबा, अपघातांमध्ये वाढ! अमळनेरमध्ये बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचारी त्रस्त

Jalgaon News : शहरातील महाराणा प्रताप चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
Traffic jam at Maharana Pratap Chowk on the main road of the city. In the second photo, reckless drivers taking the right of way as there is no signal system.
Traffic jam at Maharana Pratap Chowk on the main road of the city. In the second photo, reckless drivers taking the right of way as there is no signal system.esakal
Updated on

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरातील महाराणा प्रताप चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाईची अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत. अमळनेर शहरातून चोपडा-अमळनेर-धुळे, तसेच धरणगाव-अमळनेर-बेटावद-शिरपूर प्रमुख मार्ग जातात. (Jalgaon Pedestrians suffer due to reckless drivers in Amalner)

बेशिस्त वाहनचालक, शहरात अस्तित्वात नसलेली सिग्नल यंत्रणा, तसेच वाहतूक पोलिसांचे अवैध वाहतुकीवरील दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मुख्य रस्त्यालगत थाटलेली हॉटेल्स, वाहन पार्किंगचा अभाव, अतिक्रमण करून रस्त्यावर फळ विक्रेते दुकाने थाटतात. यामुळे मुख्य रस्त्यावरून चालणेही अवघड झाल्याचे चित्र रोजचेच झाले आहे.

यातच शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या महाराणा प्रताप चौकात बेशिस्त वाहनचालकांमुळे दुचाकी, तसेच इतर वाहनांचे अपघात रोज होतात. या मुख्य रस्त्यालगतच जी. एस. हायस्कूल, द्रौ. रा. कन्याशाळा, तसेच साने गुरुजी शाळा आहे. या शाळांचे हजारो विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

"शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत." -सचिन खंडारे, सामाजिक कार्यकर्ते (latest marathi news)

Traffic jam at Maharana Pratap Chowk on the main road of the city. In the second photo, reckless drivers taking the right of way as there is no signal system.
Jalgaon News : जिल्हा नियोजन विभागाचा अवघा 4 हजारांचा निधी परत

"बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात होऊन, वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य रस्त्यावरून शाळेत जाण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते." -कुणाल पाटील, विद्यार्थी, जी. एस. हायस्कूल

"अल्पवयीन मुले व मुलींचे स्कूटी चालविण्याचे प्रमाण वाढल्याने मुख्य रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. याबाबत पालकांनीही काळजी घेतली पाहिजे."-मनोज शिंगाणे, सामाजिक कार्यकर्ते

"बसस्थानकाबाहेरील उभी असलेली अवैध वाहतूक करणारी वाहने, तसेच त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे." -योगेश पाटील, नागरिक

"मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यात येईल,तसेच पादचारी मार्ग देखील पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी मोकळे केले जातील." -तुषार नेरकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, अमळनेर

"गर्दीच्या वेळी तसेच शाळा सुटण्याच्या वेळी मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येईल तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाईल."-विकास देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमळनेर

Traffic jam at Maharana Pratap Chowk on the main road of the city. In the second photo, reckless drivers taking the right of way as there is no signal system.
Jalgaon Agriculture News : उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी रोपांना क्रॉप कव्हर चा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.