Jalgaon News : आला पावसाळा, तुमचा जीव तुम्हीच सांभाळा! रस्त्यांची दुर्दशा, सिमेंट रस्ते उठले जिवावर

Jalgaon : आला पावसाळा वाहनधारकांनो, तुमचा जीव तुम्हीच सांभाळा...’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Potholes on the National Highway near Tarsod Fata.
Potholes on the National Highway near Tarsod Fata.esakal
Updated on

Jalgaon News : ‘आला पावसाळा वाहनधारकांनो, तुमचा जीव तुम्हीच सांभाळा...’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण शहरातील अंतर्गत रस्ते, महामार्गाचे चौक असोत की समांतर रस्त्यांची पावसाळ्यात पुरती वाट लागली आहे. काँक्रिटचे महामार्ग आहेत, तेथेही अपघातांची संख्या एरवीपेक्षा दुप्पटीने वाढलीय. जिल्ह्यात अपघातांचे सत्र वर्षभर कायम असते. पावसाळ्यातील अपघात विचित्र आणि किरकोळ चुकांमुळे जीव गमवावा लागल्याचे आढळून येत आहेत. (people suffer in damaged road in monsoon )

अवघ्या दीड महिन्याच्या पावसात डांबरी रस्त्यांनी आपली लायकी दाखवून दिली. शहरातून जाणाऱ्या एशिअन महामार्गावर अनेक ठिकाणी अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचण्यासह, खड्डे पडले आहेत. महामार्गावरील प्रमुख चौकच अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीचा भार असणारे बहुतांश रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले असून, सदोष तांत्रिक बाबींमुळे रस्ते टिकणार किती, हा प्रश्न वेगळाच असला, तरी काँक्रिट रस्त्यावंर अतिरिक्त वेग, टायर्सची अवस्था प्राणांतिक अपघातांना कारणीभूत ठरत आहे. याला यंत्रणेसह निष्काळजीपणे वाहन चालविणारे चालकही जबाबदार ठरत आहेत.

सहा महिन्यांत २६९ मृत्यू

राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ४८६ अपघात झाले. त्यात २६९ जणांचा मृत्यू आहे, तर ३५० जण जखमी झाले आहेत. बहुतांश अपघात भरधाव वाहनांचाच झाला आहे.

जुलैत २४३ अपघात

जुलैत प्राणांतिक अपघातांची संख्या २४३ असून, १६१ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ३५ अपघातांत मध्यम, तर ४७ अपघातांमध्ये किरकोळ दुखापत झाली आहे. जुलैमध्ये जागेवर ३३ जण ठार झाले आहेत. काही उपचारादरम्यान मृत झाले. २७९ गंभीर जखमी झाले. ७१ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Potholes on the National Highway near Tarsod Fata.
Jalgaon News: पाचोरा ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर! इमारतीस गळती, औषधी, उपकरणांचे नुकसान; रुग्ण त्रस्त, अधिकारी सुस्त

महिनानिहाय स्थिती अशी

महिना--अपघात--प्राणांतिक-मृत्यू

जानेवारी--७७--४५--५०

फेब्रुवारी--७७--३८--४०

मार्च--९७--४३--५२

एप्रिल--७३--४०--४५

मे--९०--४४--४६

जून--७२--३३--३६

जुलै--७९--४९--५२

एकूण--५६५--२९२--३२१

जुलैसह मार्चही घातक

सर्वाधिक ९७ अपघात मार्च महिन्यात झाले आहेत. त्यात ४३ प्राणांतिक अपघातांचा समावेश असून, सर्वाधिक ५२ मृत्यू झाले आहेत. जुलैतही अपघाताची संख्या मार्चप्रमाणेच आहे.

Potholes on the National Highway near Tarsod Fata.
Jalgaon News : उद्घाटनाआधीच पुलाखालील भराव गेला वाहून; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

खराब रस्ते

जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातून शहराच्या दिशेने, तालुका ठिकाणचे रस्ते पावसामुळे पुरते खराब झाले आहेत. रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने डांबरी रस्ते उखडून अपघाचे प्रमाण वाढले आहे. निकृष्ट काम, अवजड वाहतुकीमुळे हे रस्ते खराब झाले आहेत.

काँक्रिट रस्ते अन्‌ टायर

जिल्ह्यात बहुतांश महामार्ग, जिल्ह्याला जोडणारे प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. या रस्त्यांवर कारचालकांचा वेग वाढला आहे. कारच्या टायर्सची परिस्थिती कशी-काय आहे? हवा किती पाहिजे, याची पडताळणी न करताच चालक सुसाट वाहने दामटतात आणि चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होतात. अशा अपघातांना दुचाकीही अपवाद नाहीत.

विनासाईड पट्ट्यांचे रस्ते

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्ग, चाळीसगाव-पाचोरा, जळगाव-पाचोरा या रस्त्यांवर साईडपट्ट्याच नसल्याने एखादे वाहन खराब झाले किंवा रस्त्याच्या कडेला थांबवायचे झाले तर थांबवणार कसे? रस्त्यावर उभी वाहने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

Potholes on the National Highway near Tarsod Fata.
Jalgaon News : विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू; मनवेल आश्रमशाळेतील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.