Jalgaon News : ख्वाजामिया चौकातील भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा

Jalgaon : शहरातील गणेश कॉलनी रस्त्यावरील ख्वॉजामिया चौकात बसणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना हटविण्यात येऊन त्यांना ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या मोकळ्या जागेत बसविण्यात येणार आहे.
Vegetable Seller
Vegetable Selleresakal
Updated on

Jalgaon News : शहरातील गणेश कॉलनी रस्त्यावरील ख्वॉजामिया चौकात बसणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना हटविण्यात येऊन त्यांना ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या मोकळ्या जागेत बसविण्यात येणार आहे. ही जागा समतल करण्यासाठी अतिक्रमण विभागाने बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.

सायंकाळी वाहतूक ठप्प

रस्त्यावर भाजी व फळ विक्रेते बसत असल्याने खरेदी करणारे ग्राहक या ठिकाणी दुचाकीवर बसूनच भाजी व फळे खरेदी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. (Jalgaon Permanent space for vegetable vendors in Khwajamiya Chowk)

सायकांळी कार्यालय सुटल्यावर खरेदीदारांची रस्त्यावरच गर्दी होउन वाहतूकही ठप्प होते. सायंकाळी गर्दीमुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरच वाहनांची गर्दी होते, त्यातच या ठिकाणी पेट्रोल पंपही आहे. त्या ठिकाणीही पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघाताची शक्यता आहे.

पुन्हा पुन्हा अतिक्रमण

अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जाते परंतु विक्रेते त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करीत असतात. अनेक वेळा कारवाई करूनही फायदा होत नाही. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिक्रमणधारकांना जागा देणार

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सांगण्यात आले की, या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जवळच असलेल्या ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या मोकळ्या जागेवर त्यांना बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेली जागा समतल करून द्यावी असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.त्याचे काम झाल्यावर या विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात येईल. (latest marathi news)

Vegetable Seller
Jalgaon News : जळगावहून लवकरच प्रवाशी विमानसेवा सुरू होणार

"ख्वॉजामिया चौकातील रस्त्यावर बसणाऱ्या अतिक्रमणधारक विक्रेत्यांबाबत तक्रारी आहेत. वाहने रस्त्यावरच लागत असल्याने अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे विक्रेत्यांना मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतरही विक्रेते रस्त्यावर आल्यास माल जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येईल." - अतुल पाटील निरिक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग महापालिका जळगाव

दोन शिफ्टमध्ये पथक

कारवाईनंतर अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर बसत असल्याने अतिक्रमण विभागाचे पथक दोन शिप्टमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. रात्री आठपर्यंत स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात येणार आहे. सायंकाळी रस्त्यावर अतिक्रमणधारक बसल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

Vegetable Seller
Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.