Jalgaon Crime News : जळगाव-पुणे ट्रॅव्हल्समधून 10 काडतुसांसह पिस्तूल जप्त! कोथरूडच्या तरुणास अटक

Jalgaon News : जळगाव-पुणे लक्झरीमधून १० जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तूल नेत असलेल्या पुण्यातील तरुणाला अजिंठा गावातच ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव-पुणे लक्झरीमधून १० जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तूल नेत असलेल्या पुण्यातील तरुणाला अजिंठा गावातच ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पिस्तूल तरुण स्वतः वापरणार होता, की पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवणार होता, याचा शोध पोलिस घेत आहे. मयूर सतीश भरेकर (वय २८, रा. कोथरूड, ता.जि. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. (Jalgaon Crime News)

पुण्याच्या कोथरुड परिसरातील रहिवासी मयूर भरेकर पिस्तूल खरेदीसाठी जळगावला आला होता. जळगावमार्गे त्याने सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून १० जिवंत काडतूस आणि गावठी पिस्तूल खरेदी केले. पिस्तूल घेऊन तो जळगावला परतला. तेथून लक्झरी (एमएच १९, सीवाय ०२३४)मधून तो शुक्रवारी (ता. १९) पुण्यासाठी निघाला.

मिळालेल्या माहितीवर अजिंठ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरीक्षक शरद वाघुले, संदीप कोथळकर, संजय कोळी यांनी सापळा रचला. ११ वाजून ५० मिनिटांनी जळगाव-पुणे बस अंजिठा येथील हॉटेल आशीर्वादवर थांबली. (latest marathi news)

Jalgaon Crime News
Jalgaon Cyber Crime : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून वृद्धाची 59 लाखांत फसवणूक; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

पोलिसांनी तपासणी केल्यावर मयूर भरेकरजवळ १० जिवंत काडतूस आणि गावठी पिस्तूल आढळले. पोलिसांनी संशयिताला अटक केली. याबाबत पोलिस कर्मचारी संदीप कोथळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिंठा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मोबाईलवर संपर्क

पिस्तूल विक्रेत्यांचे मोठ्या शहरांमध्ये नेटवर्क आहे. चोपडा, भुसावळ, अमळनेर आणि जळगाव येथील एजंट थेट संपर्क करून गावठी पिस्तूलचा पुरवठा करतात. ऑनलाईन पैशांची देवाण-घेवाण झाल्यानंतर पिस्तूल हवे असलेला व्यक्ती कुठूनही जळगावात दाखल होतो. ठरल्या जागी त्याला एजंटमार्फत मालाचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : ट्रॅक्टर न दिल्यावरून तरवाडेत बापलेकास मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com