जळगाव : पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा काळ म्हणून हिंदू धर्मियांमध्ये भाद्रपद महिन्यातील उत्तर पंधरवडा अर्थात, कृष्णपक्ष ओळखला जातो.. त्यालाच पितृपक्ष म्हणतात.. पितृपक्षात आपल्या दिवंगतांप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी म्हणून श्राद्ध, तर्पणादी विधींना फार महत्त्व आहे.. अशा पितृपक्षाला बुधवारपासून (ता.१८) सुरवात होत आहे. पितृपक्षामधे आपल्या कुटुंब अथवा मित्रपरिवारातील दिवंगतांचे श्राद्ध- तर्पणाद्वारे स्मरण करण्याची परंपरा आहे.. जवळच्या व्यक्तीचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्या पितृपक्षातील तिथीला श्राद्ध करण्याची पद्धत आहे. त्यानुसार श्राद्धादी विधी करण्यासाठी तिथीनिहाय वेळापत्रक पंचांग आणि दिनदर्शिकांमध्येही दिलेले असते.