जळगाव : जळगावहून पुण्यासाठी जाणाऱ्या फ्लाय-९१ कंपनीच्या रविवारच्या विमानाचे उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ज्यांना पुण्याहून इतर ठिकाणी जायचे होते, त्यांचे वेळापत्रक बिघडले. तांत्रिक कारणास्तव उड्डाण रद्द झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ज्या प्रवाशांना जाणे अनिवार्य होते, अशा काही जणांनी खासगी वाहनांद्वारे पुण्याकडे प्रस्थान केल्याचे सांगण्यात आले. (Jalgaon Plight of passengers Pune flight canceled on time)
जळगाव विमानतळावरून फ्लाय- ९१ या विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीने गोवा, हैद्राबादपाठोपाठ पुण्यालाही सेवा सुरू केली. या तिन्ही ठिकाणच्या विमानसेवेला जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातही पुण्याच्या फेऱ्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच आठवड्यातून तीनदा असलेल्या फेऱ्या वाढवून चार दिवस करण्यात आल्या.
रविवारचे उड्डाण रद्द
पुण्याकडील सेवेत रविवारी जाणाऱ्या उड्डाणास प्रवाशांचा प्रतिसाद तुलनेने अधिक असतो. कारण, खानदेशातील बहुतांश तरुण नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात स्थायिक झाले असून, काहीजण नियमितपणे शनिवारी व रविवारी पुणे- जळगाव- पुणे, असा दौरा करीत असतात.
त्यानुसार रविवारचे उड्डाण फुल्ल होते. मात्र, उड्डाणाच्या काही वेळ आधी कंपनीने हे उड्डाण तांत्रिक कारणास्तव रद्द होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी चांगलीच गैरसोय झाली. अनेकांचे वेळापत्रक बिघडले. (latest marathi news)
खासगी वाहनांनी प्रस्थान
ज्यांना जाणे अनिवार्य होते, त्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. काहींनी खासगी वाहने करून पुण्याकडे प्रस्थान केले, तर काहींनी दुपारपासून खासगी ट्रॅव्हल्ससाठी शोधाशोध सुरू केली. रेल्वेगाड्यांना आरक्षण मिळणे कठीण असल्याने सायंकाळपर्यंत थांबून काही प्रवासी खासगी बसने पुण्याकडे रवाना झाले.
अन्य उड्डाणे नियमित
पुण्याचे उड्डाण ऐनवेळी रद्द झाले असले, तरी फ्लाय- ९१चे गोवा व हैद्राबाद तसेच या आठवड्यातील नियमित उड्डाणे तशीच सुरू राहतील. त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे फ्लाय-९१ने कळविले आहे. शिवाय, मुंबईचे उड्डाणही सुरू असल्याचे विमानतळ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.