Crime News : जळगाव पोलिसांच्या एका दौऱ्यात 2 गुन्ह्यांचा उलगडा; संशयितांना पुण्यातून अटक

Arrest Police
Arrest Police Sakal
Updated on

जळगाव : एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने भादलीतील तरुणी अत्याचार प्रकरणातील संशयितासह फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरारी संशयितांना पुणे शहरातून बेड्या ठोकल्या. गणेश सपकाळे (वय ३५, रा. भादली, ता. जळगाव, ह.मु. पुणे), संतोष खडे (४५), चंद्रकांत जाधव (४०, दोघे रा. हडपसर, पुणे) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

Arrest Police
Cyber Crime : महिला वकिलासह गृहिणीच्या खात्यात सायबर गुन्हेगारांचा डाका

पोलिस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिस शेख, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे यांनी हडपसर भागातून संशयितांना अटक केली. मागील महिन्यात एमआयडीसी पोलिसांत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गणेश सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याला पुण्यातील शिरुर गावातून ताब्यात घेतले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Arrest Police
Jalgaon : त्या मिस्त्रीच्या मृत्यूला जबाबदार घरमालकावर गुन्हा

बारा लाखांची फसवणूक

तक्रारदार अब्दुल जब्बार कादर पटेल (मेहरून, जळगाव) यांची ६ ऑगस्ट २०२२ ला संतोष खडे व चंद्रकांत जाधव यांनी भंगारच्या व्यवहारात भागीदारी करण्याचे आश्वासन देत ११ लाख ९० हजारांची रोकड घेत पळ काढला होता. संशयितांना पुणे शहरातील स्टेशन रोड परिसरातून पुण्याच्या क्राईम ब्राँच एकच्या पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.