Jalgaon Bribe Crime : वाळू व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना पोलिस अटकेत; भडगाव ठाण्यातील कर्मचाऱ्यावर कारवाई

Fraud Crime : भडगाव येथील हवालदाराने वाळू व्यावसायिकाला २ लाख ६० हजारांची लाच मागितली.
Fraud Crime
Fraud Crime Sakal
Updated on

Jalgaon Bribe Crime : भडगाव येथील हवालदाराने वाळू व्यावसायिकाला २ लाख ६० हजारांची लाच मागितली. तडजोडी अंती ५० हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी (ता. २६) सकाळी ही कारवाई करण्यात आली. वाळूमाफियांकडून पोलिसांना अडकविण्याची कारवाई नेहमीच होते. तरीही पोलिस वाळूमाफियांना अभय देतात. (Police arrested while accepting bribe from sand businessman )

भडगाव येथील २८ वर्षीय तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापूर्वी भडगाव ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात दोन गुन्हे दाखल आहेत. सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी भडगाव ठाण्यातील हवालदार किरण रवींद्र पाटील (वय ४१) यांनी २ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

Fraud Crime
Jalgaon Sand News : नांद्रा बुद्रुक वाळू डेपोला स्थगिती ? ठेका स्थगित करण्याची जिल्हा प्रशासनावर नामुष्की

गुरुवारी (ता. २५) पंचासमोर लाच मागणीची पडताळणी केली असता, हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदाराकडे २ लाख ६० हजारांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता ५० हजार रुपये देण्याचे ठरले. शुक्रवारी (ता. २६) किरण पाटील यास लाच घेताना मुद्देमालासह पकडण्यात आले. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

Fraud Crime
Jalgaon Fraud Crime : सासू-शालकाची जीवन संपवण्याची धमकी; न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()