Jalgaon Police: कुणी घर देता का घर? पोलिसांची शोधाशोध; ‘खाकी वर्दी’ निवासस्थानापासून वंचित! दुरवस्था झाल्याने वसाहती ओस

Latest Jalgaon News : भाड्याच्या घरचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पायपीट होत आहे. अशा परिस्थितीत शासकीय निवासस्थाने पोलिसांना कधी मिळणार? हा यक्ष प्रश्न अनेक वर्षांपासून उभा आहे.
Dilapidated and disused old police quarters near Station Road Rural Hospital
Dilapidated and disused old police quarters near Station Road Rural Hospitalesakal
Updated on

सावदा (ता. रावेर) : येथील पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने त्याचा वापर करणे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे खासगी घरे भाड्याने घेतल्याशिवाय पोलिसांसमोर दुसरा पर्याय उरत नाही. भाड्याच्या घरचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पायपीट होत आहे. अशा परिस्थितीत शासकीय निवासस्थाने पोलिसांना कधी मिळणार? हा यक्ष प्रश्न अनेक वर्षांपासून उभा आहे. (Police manhunt for house)

येथे ब्रिटिशकालीन पोलिस ठाणे आहेत. पोलिस ठाण्याच्या अगदी जवळच ग्रामीण रुग्णालयाजवळ जुनी पोलिस वसाहत आहे तर दुसरी वसाहत पोलिस ठाण्याच्या आवारात आहे. पोलिस ठाण्यातील घरांची अवस्था जेमतेम ठीकठाक असल्याने त्यांचा वापर सुरू आहे. पण ग्रामीण रुग्णालयाजवळील घरांची दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या घरांचा वापर बंद झाला आहे. शासकीय निवासस्थाने उपलब्ध नसल्याने येथे नियुक्तीला असलेल्या आणि नवीन आलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलिसांची भाड्याने घर घेण्यासाठी शहरात पायपीट करावे लागते. शहराचा विचार केला तर येथे घरांची संख्या तशी कमी आहे. आणि जी आहे त्यांचे भाडे जरा जास्तच आहे. असे काही पोलिसांनी ‘सकाळ’जवळ बोलून दाखवले.

येथील पोलिस ठाण्यात सुरवातीपासून मंजूर ३२ कर्मचारी असलेला स्टाफ आहे. त्यात एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग आहे. जिल्हास्तरावरून अतिरिक्त पोलिस बळ दिल्यास भर म्हणून ५० ते ५२ पर्यंत संख्या जाते. अर्थात पोलिसांना किमान ४० घरांची आवश्यकता आहे.

परंतु पोलिस ठाण्याच्या आवारात जेमतेम दहा ते बारा निवासस्थाने आहेत. त्यामुळे बाकीच्या पोलिसांना शहरात भाड्याने घरे घ्यावे लागतात. अगदी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्य काळापासून येथे शासकीय पोलिस निवासस्थानांची मागणी आहे. परंतु अनेक वर्ष लोटली; पण ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. (latest marathi news)

Dilapidated and disused old police quarters near Station Road Rural Hospital
Harsul Lake : हर्सूल तलाव होणार ओव्हरफ्लो; पाणी पातळी २६ फुटांवर; जुन्या शहरात मिळणार पाच दिवसाला पाणी

पाठपुराव्याला सुरूच..

प्रत्येक वेळी संबंधित खासदार, आमदार यासाठी प्रयत्न करीत असतात; पण त्यांना यश आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा असताना त्यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मुक्ताईनगर मतदारसंघातील कुऱ्हा काकोडा, मुक्ताईनगर,सावदा, बोदवड या पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आणि त्यांच्यासाठी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली होती.

त्यानंतरही त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनीही या विषयासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला आहे. आताही ते मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार असून, निवेदन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

तर आताही आपण या विषयासाठी पुन्हा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून वेळ पडली तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितले. पोलिस ठाण्यातर्फेही यापूर्वी वरिष्ठ आणि शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, पुन्हा याबाबत एक स्मरणपत्र देण्यात येईल, असे नवनियुक्त सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले.

Dilapidated and disused old police quarters near Station Road Rural Hospital
Orange Fruit Farming : कासवगतीने काम सुरू, शेतकरी हवालदिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.