Jalgaon Police Transfer : पोलिस ठाण्यांना तपासी अंमलदारांची कमतरता

Jalgaon Police Transfer : जळगाव जिल्‍ह्‍यातील ३४ पोलिस ठाण्यांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सहाय्यक फौजदार,नाईक आणि हवालदारांची कमतरता आहे.
Police
Police esakal
Updated on

Jalgaon Police Transfer : जळगाव जिल्‍ह्‍यातील ३४ पोलिस ठाण्यांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सहाय्यक फौजदार,नाईक आणि हवालदारांची कमतरता आहे. मनुष्यबळ कमी असलेल्या पोलिस ठाण्यांना तुर्तास पोलिस अधीक्षकांनी मुख्यालयातील ४२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात बारा महिला कर्मचारी आहेत. (Jalgaon Police stations lack of investigative officers)

आगामी लोकसभा निवडणुका पोलिस ठाण्यात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अडचणी तसेच मुख्यालयातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या ४२ कर्मचाऱ्यांच्या पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बदली आदेश पारित केले आहेत. यात १२ महिला कर्मचारी आहे.

तपासाधिकारी मिळेना..

जिल्‍हा पोलिस दलातील ३४ पोलिस ठाण्यांपैकी बहुतांश पोलिस ठाण्यांना दुय्यम अधिकारी, सहाय्यक फौजदार, हवालदार, ठाणे अंमलदार मंजुर पटसंख्येपेक्षा कमी असून उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. दाखल गुन्ह्यांसाठी बहुतांश वेळेस तपासाधिकारी मिळत नाही. ज्या कर्मचाऱ्यांकडे पुर्वी पासुनच गुन्ह्याच्या तपासाचा ताण असतांना नवे गुन्हेही तपासासाठी त्यांच्याकडे येत असल्याने पेंडन्सीत वाढ होऊ लागली आहे.

सीसीटिएनएस मध्ये अडकलं मनुष्यबळ

हाताने फिर्याद लिखाणाची पद्धत कालबाह्य झाली असून संगणकावर पोलिस दलाच्या CCTNS (क्राइम ॲण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम ) प्रणालीद्वारेच ऑनलाईन पद्धतीने तक्रार (FIR) नोंदवण्यात येते. तक्रारदाराची तक्रार ऐकून घेतल्यावर ठाणे अंमलदार गंभीर गुन्हा असल्यास क्राईम रायटर कडून फिर्याद टाईप करुन घेतो. (latest marathi news)

Police
Jalgaon Municipality News : सामान्य बेघरांसाठी समता नगरात 816 घरांचा प्रकल्प; महापालिकेतर्फे उभारणी

सिसीटीएनएस कर्मचारी कॉपी करुन ऑनलाईन पेस्ट करतो. या एकट्या प्रणालीसाठी १ ठाणे अंमलदार, १ काईम रायटर, १ सिसीटीएनएस ऑपरेटर अशा किमान तीन कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ खर्ची पडते. पूर्वी प्रत्येक ठाणे अंमलदार हाताने डायरीवर तक्रार नोंदवून घेत.

संगणक सज्ञान आहेत कमी!

पोलिस दलात अगोदरच मनुष्यबळाची कमतरता, त्यात संगणक साक्षरांची कमतरता यामुळे अनेक तपासाधिकारी स्वतःचे कागदं स्वतः टाइप करून दोषारोप पत्र तयार करतात. ज्यांना संगणक चालवता येते तरी, त्यांना रायटर हवे असतात.प्रत्येक अधिकाऱ्याला एक रायटर हवा असल्याने तिथे एक माणुस खर्ची पडतो. परिणामी अगोदरच कमी मनुष्यबळ त्यात हे कर्मचारी इतरत्र अडकल्याने ताणाताण वाढते.

Police
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.