Jalgaon Police Transfer : पोलिसांचे बदली गॅझेट अंतिम टप्प्यात! एसपींनी घेतल्या ऑनलाईन मुलाखती

Jalgaon News : पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वत: बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या मुलखती घेण्यास सुरवात केली आहे.
Police Transfers
Police Transfersesakal
Updated on

Jalgaon Police Transfer : जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक फौजदार, नाईक, शिपाई दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी पूर्णत्वास आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वत: बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या मुलखती घेण्यास सुरवात केली आहे. (Jalgaon Police Transfer Gazette in Final Phase)

जिल्‍हा पोलिस दलाच्या अस्थापना मंडळाच्या अटी शर्तीनुसार एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी, उपविभागात १२ वर्षे पूर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार झाली असून, बदलीपात्र उमेदवारांना नियमानुसार पसंतीक्रमानुसार ३ जागा निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्जात तीन जागांचा पर्याय निवडल्यानंतर कर्मचाऱ्याची मुलाखत अस्थापना मंडळातर्फे घेऊन पोलिस दलाच्या गरजेनुसार आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या स्कीलनुसार बदल्या करण्यात येणार आहेत.

प्रथमतः ऑनलाईन मुलाखती

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळात प्रथमच ऑनलाईन मुलाखतींचा पर्याय निवडण्यात आला असून, मंगळवारी (ता. ९) पहिल्याच दिवशी सहाय्यक फौजदार, पोलिस नाईक, कॉन्स्टेबलपदाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलखाती स्वतः पोलिस अधीक्षकांनी घेतल्या. बुधवारी (ता. १०) सहाय्यक फौजदार, नाईक, शिपाई, महिला कर्मचारी, पुरुष शिपाई, आणि मोटारवाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. (latest marathi news)

Police Transfers
Global Politics: मोदींना जड गेलेला मुद्दा हलवतोय जगभराच राजकारण, निवडणुकीच्या वर्षात ठरली डोकेदुखी

कर्मचारी तुटवडा

सर्वसाधारण बदल्यांच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वाधिक त्रास होतो तो नेतेमंडळींकडून येणाऱ्या याद्यांचा. कारण प्रत्येकालाच पसंतीच्या जागी नोकरी करायची असते. जिल्‍ह्यात राहूनही प्रत्येकाला आवडीचे पोलिस ठाणेच हवे असते किंवा अमूक पोलिस अधिकाऱ्याकडेच ड्यूटी करायची असते. तर बहुतांश मंडळींना कमाईवाली जागा हवी असते.

परिणामी, बदल्या करताना अस्थापना मंडळासह पोलिस अधीक्षकांच्या नाकीनऊ येते. पुढाऱ्यांच्या ढवळाढवळमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता, तपासासाठी क्राईम रायटरची क्षमता असणारे सहाय्यक फौजदार नसणे, ड्यूट्यांना कर्मचारी नसणे, महिला कर्मचाऱ्यांचा तुटवडा, अशा समस्या संबंधित पोलिस ठाण्याला भेडसावतात.

यांच्या झाल्या मुलाखती

सहाय्यक फौजदार : ७८

नाईक : १७६

शिपाई : ६७

Police Transfers
Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.