Polio Vaccination: जळगाव जिल्ह्यात 4 लाखांवर बालकांनी घेतली पोलिओची मात्रा! ‘दो बुंद’ डोस देऊन पल्स पोलिओ लसीकरणाला सुरवात

Jalgaon News : शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी नवजात बालकांना ‘दो बुंद’ पोलिओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन लसीकरणाला सुरवात झाली.
Polio Vaccination
Polio Vaccinationesakal
Updated on

जळगाव : शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी नवजात बालकांना ‘दो बुंद’ पोलिओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन लसीकरणाला सुरवात झाली. (Jalgaon Polio Vaccination amount of polio taken by children over 4 lakh marathi news

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेकानंद बिराजदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे उपस्थित होते.

या सोबतच चाळीसगाव येथे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते तर मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते व इतर तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक आमदारांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. देशभर ३ मार्चला नवजात पालक ते पाच वर्षाच्या बालकांना डोस देण्यात येतो. (latest marathi news)

Polio Vaccination
Sleep and Mood: झोपेचा Mood वर, mental health वर कसा परिणाम होतो? | World Sleep Day 2024

जिल्ह्यात २६८३ केंद्र

जिल्हा २६८३ केंद्र पोलिओ लसीकरणासाठी उभारण्यात आले. यात स्थालांतरित लोकसंख्येतील काही बालके लसीपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मजूर वसाहती, विट भट्टया कारखाने, ऊसतोडी कामगार फिरस्ते कुटुंबे ज्या भागात वास्तव्यास आहेत, अशा ठिकाणी मोबाईल टीमद्वारे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणासाठी जिल्हाभरात १६१ मोबाईल टीम, तर १४२ इतर टीम कार्यरत होत्या. रविवारी दिवसभरात जवळपास ४ लाख १४ हजार ३९१ बालकांनी पोलिओ डोस घेतला. जिल्ह्यात ९६ टक्के बालकांना डोस देण्यात आला. रविवारी ज्या बालकांनी डोस घेतला नसेल त्यांच्यासाठी ५ ते ८ मार्च दरम्यान घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहेत.

Polio Vaccination
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.