K. C. Padvi
K. C. Padviesakal

Jalgaon Congress News : काँग्रेसची 10 मतदारसंघ लढण्याची तयारी! माजी मंत्री ॲड. पाडवी उद्या घेणार मुलाखती

Latest Political News : जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ३) दुपारी बाराला काँग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.
Published on

Jalgaon Congress News : जिल्हा काँग्रेसने जळगाव ग्रामीण वगळता इतर १० मतदारसंघांत लढण्याची तयारी केली आहे. जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ३) दुपारी बाराला काँग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. (Congress preparing to contest 10 constituencies)

विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवरात्रोत्सवात निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यस्तरावर अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप जाहीर झालेले नाही.

असे असले, तरी सर्वच पक्षांकडून सर्वच जागा लढण्याची तयारी केली जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार असले, तरी यंदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसकडून जळगाव ग्रामीण वगळता इतर सर्व १० मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी केली जात आहे.

जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद नसली तरी काँग्रेसचा मतदार जिल्ह्यातील काही भागात टिकून आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसने १० जागा लढविण्याची तयारी केली आहे. प्रदेश काँग्रेसने यापूर्वीच जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची नावे मागविली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १० मतदारसंघांतील ३९ इच्छुकांची नावे प्रदेश काँग्रेसला पाठविली आहेत. (latest marathi news)

K. C. Padvi
Akshay shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काउंटर खरा की खोटा? अलाहबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश शोधणार सत्य

इच्छुक उमेदवार

जिल्हा काँग्रेसने पाठविलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये चोपडा- प्रभाकर सोनवणे, रावेर- दारा मोहंमद, ज्ञानेश्वर महाजन, ॲड. धनंजय शिरीष चौधरी, आमदार शिरीष चौधरी, भुसावळ- डॉ. सुवर्णा गाडेकर, ॲड. प्रवीण सुरवाडे, शैलेंद्रकुमार नन्नवरे, सागर वानखेडे, प्रा. मनोहर संदानशिव, शैलेश बोदडे, जितेंद्र चांगरे, रवींद्र निकम, श्‍यामकांत तायडे, दिनेश भोळे, जळगाव शहर- गोकुळ चव्हाण, ॲड. सलीम पटेल, राजेश मंडोरे, अमळनेर- सुलोचना वाघ, डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, कैलास पाटील, संदीप घोरपडे, संगीता पाटील, शांताराम पाटील, एरंडोल- विजय पंढरीनाथ महाजन, चाळीसगाव- डॉ. संयोगिता नाईक, पाचोरा- सचिन सोमवंशी, प्रदीप पवार, डॉ. उत्तम महाजन, जामनेर- शरद त्र्यंबक पाटील, डॉ. ऐश्‍वरी राठोड, मदनसिंग जाधव, सुभाष जाधव, आत्माराम जाधव, शंकर बेनाडे, मुक्ताईनगर- डॉ. जगदीश पाटील, उदयसिंग पाटील यांचा समावेश आहे.

पाडवी घेणार आढावा

प्रदेश काँग्रेसने जिल्हानिहाय नियुक्त केलेल्या निरीक्षकांना इच्छुकांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसकडून लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी दुपारी बाराला काँग्रेस भवनात घेतल्या जाणार आहेत. त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसला सोपविला जाणार आहे. दरम्यान, जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे.

K. C. Padvi
Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Scheme : जळगाव जिल्ह्यातील 729 शेतकऱ्यांना तीन कोटी सात लाखांचा लाभ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.