Jalgaon Political : ‘महायुती’त गैरव्यवहाराचे अनेक महामेरू : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील; गृहमंत्री शहांनी त्यावर बोलावे

Political News : पंचवीस नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्यातील बहुतेक महायुतीत गेल्याने ते पवित्र झाले का? गैरव्यवहार करणाऱ्यांपैकी २३ जणांची चौकशी थांबली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

Jalgaon Political : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत कथित गैरव्यवहाराबाबत बोलण्यापेक्षा ‘महायुती’त गैरव्यवहाराचे अनेक महामेरू आहेत, त्यांच्याविषयी बोलावे. पंचवीस नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्यातील बहुतेक महायुतीत गेल्याने ते पवित्र झाले का? गैरव्यवहार करणाऱ्यांपैकी २३ जणांची चौकशी थांबली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Jalgaon President Jayant Patil allegations on mahayuti)

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आज जिल्हा मेळावा घेतला. दिवसभर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभेबाबत मते जाणून घेतली. त्यानंतर सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाचे निरीक्षक प्रसन्नजित पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

आमदार एकनाथ खडसे यांनी अजून ‘राष्ट्रवादी’चा राजीनामा दिलेला नाही, खरेच त्यांनी राजीनामा दिला आहे का? यावर हसत पाटील म्हणाले, की खडसेंना भाजप अजून प्रवेश देत नाही, त्यांनी ‘राष्ट्रवादी’चा राजीनामा दिला का? दिला असेल तर टपालाने आला असेल, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

मराठा आरक्षण मिळावे

मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे, त्यावर श्री. पाटील म्हणाले, की महायुती सरकारने त्यांना आरक्षण देण्याबाबत शब्द दिला आहे, तो सरकारने पाळावा. प्रत्येकाला त्याच्या कोट्याप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे, असे आमचे मत आहे.

‘मेरिट’ पाहून जागा वाटा

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीने अजून कोणाच्या वाट्याला किती जागा देण्याविषयी ठरविले नाही. तरी ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे, अशांना आम्ही उमेदवारी देऊ. जिंकून येण्याचे ‘मेरिट’ पाहून आघाडीतील मित्रपक्षाला जागा सोडल्या जातील.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर या मतदारसंघांत ‘राष्ट्रवादी’ला उमेदवारी हवी, असा पदाधिकाऱ्यांचा कल आहे. जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, एरंडोल-पारोळा यावर अगोदरपासूनच दावा आहे. जळगाव जिल्ह्यात सहा ते सात जागांवर आमचे प्रबळ उमेदवार राहतील. (latest marathi news)

Jayant Patil
Jalgaon Political News : विधानसभेसाठी पाचपेक्षा जास्त इच्छुक; डॉ. बी. एस. पाटील : पत्रकार परिषदेत मंत्र्यांवर आरोप

जिल्हाध्यक्षबाबत लवकर निर्णय

जिल्हा कार्यकारिणीविषयी विचारले असता, श्री. पाटील म्हणाले, की माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष पदाविषयी मुलाखती घेऊन अहवाल दिला आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चाळीसगावची जागा मिळावी

मागील विधानसभेत चाळीसगाव मतदारसंघात राजीव देशमुख यांचा केवळ २२०० मतांनी पराभव झाला होता. आता माजी खासदार उन्मेष पाटील व श्री. देशमुख यांनी जोर लावल्यास देशमुख नक्कीच विजयी होतील. माजी खासदार पाटील यांना ‘उबाठा’तर्फे चाळीसगावऐवजी दुसरा मतदारसंघ द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

जळगाव शहर मतदारसंघाची जागा ‘राष्ट्रवादी’ने लढवावी. गत निवडणुकीत ४८ हजार मते आपल्या उमेदवाराला मिळाली होती. जामनेर, चोपडा या मतदारसंघावरही उमेदवार इच्छुक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे श्री. पाटील म्हणाले.

Jayant Patil
Jalgaon Political News: नगरसेवकांची दिशाभूल करून ‘अजेंड्या’वर घेतल्या स्वाक्षऱ्या! बोदवड ‘राष्ट्रवादी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.