Jalgaon Political News : स्वाभिमान असेल तर खडसेंनी राजीनामा द्यावा : संजय पवार

Jalgaon Political : माजीमंत्री, आमदार एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण केले. अनेक नेत्यांना संपविले.
Sanjay Pawar
Sanjay Pawar esakal
Updated on

Jalgaon Political News : माजीमंत्री, आमदार एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण केले. अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना उजेडात आणले. त्या पवारांना अंधारात ठेवून त्यांनी सुनेची उमेदवार आणली. ज्यांनी मतदान केले त्यापैकी २५ सदस्य आज अजित पवारांसोबत आहे. (Jalgaon political Sanjay Pawar statement Khadse should resign from MLA)

स्वाभिमान असेल तर खडसे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) संजय पवार यांनी दिले. खडसेंनी अजित पवारांसह मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर श्री पवार यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका मांडत खडसेंवर आरोप केले. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील.

अरविंद मानकरी, सीमा नेहते, रमेश पाटील, योगेश देसले, सोनाली पाटील हेही उपस्थित होते. श्री पवार म्हणाले की, खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर आमदारकी मिळवली, मुलीला प्रदेशाध्यक्ष केले. (latest marathi news)

Sanjay Pawar
Jalgaon News : सातपुड्यात सोमवार पासून भोंगऱ्या बाजाराची धामधूम

रावेर लोकसभेची जागा मीच लढणार म्हणून वातावरण करीत सुनेच्या भाजप तिकिटाची आखणी केली. आता सुनेची उमेदवारी जाहीर होताच ते मैदान सोडून पळून गेले.

भाजपला झाले नाहीत

ज्या भाजपने त्यांना ३५ वर्ष मान सन्मान दिला त्यांना ते झाले नाही. लेवा समाजावर अन्याय होतो म्हणून ते सांगतात मात्र गेल्या वेळी हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी कापताना त्यांना ते दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना मी पक्ष बांधणी करेल असे ते म्हणाले होते, मात्र त्यांनी पक्षाचा वापर करून घेतला. असा आरोप जिल्हाध्यक्ष पवार यांनी केला आहे.

Sanjay Pawar
Jalgaon News : नागझिरी पुलाचे काम सुरू होण्याआधीच थांबले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.