Jalgaon Political News : गुलदस्त्यातील राजकीय भूमिका सुरेशदादा जैनांनी केली जाहीर

Lok Sabha Election 2024 : येत्या लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या जळगाव व रावेर येथील उमेदवारासोबत असल्याचे जाहीर केले.
Sureshdada Jain
Sureshdada Jainesakal
Updated on

Jalgaon Political News : राज्याचे माजी मंत्री व शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सुरेशदादा जैन यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तसेच त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, येत्या लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या जळगाव व रावेर येथील उमेदवारासोबत असल्याचे जाहीर केले. (Jalgaon Political Sureshdada Jain BJP support loksabha eletion 2024)

Sureshdada Jain
Priyanka Gandhi : भाजपची विचारधारा आदिवासींविरोधी : प्रियांका गांधी; पंतप्रधान मणिपुरातील आदिवासींवरील अत्याचारावर का बोलत नाहीत?

सुरेशदादा जैन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मुंबई येथे घेतला होता. त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. ते शनिवारी (ता. ११) जळगाव येथे आले. भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, उमेदवार स्मिता वाघ यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली.

त्यावेळी आमदार जैन यांनी आपण राजकीय संन्यास घेतला आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला आपली साथ आहे. त्यामुळे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांसोबत आपण आहोत, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. आपल्यावर भाजपचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Sureshdada Jain
Jalgaon Lok Sabha Election 2024: प्रचार तोफा थंडवल्या, आता प्रतिक्षा मतदानाची! शेवटच्या दिवशी उमेदवारांचा रॅलीवर अधिक भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.