Jalgaon Politics : खडसे अन् महाजनांमध्ये रंगणार चुरस; जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती उठली

eknath khadse-girish mahajan
eknath khadse-girish mahajanesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीवरील स्थगिती शुक्रवारी (ता. २) उठविण्यात आली. त्यामुळे शनिवार (ता. ३)पासून पुन्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. १० डिसेंबरलाच मतदान होणार असून, ११ डिसेंबरला मतमोजणी होईल. उमेदवारांना चिन्हवाटप झाले असून, त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल.

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शासनाने जाहीर केल्या. जळगाव जिल्ह्यातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी मतदान करता यावे, म्हणून २९ नोव्हेंबरला शासनाने अध्यादेश काढून आहे, त्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या.

eknath khadse-girish mahajan
Jalgaon Agriculture News : शेतीच्या मशागतीला ‘अवजार बँके’चा बूस्टर

शासनाच्या सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने शुक्रवारी अध्यादेश जारी करून या निवडणुकीवरील स्थगिती उठविली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

त्यामुळे कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, ही बाब लक्षात घेता जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाचा निवडणुकीला २९ नोव्हेंबरला स्थगिती देण्यात आली. त्या टप्प्यापासून पुढे प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश देण्यात येत आहे. या आदेशामुळे आता पूर्वीप्रमाणे १० डिसेंबरलाच मतदान होईल, तर ११ डिसेंबरला मतमोजणी होईल. मात्र, प्रचारासाठी उमेदवारांना दिवस कमी मिळणार आहेत.

eknath khadse-girish mahajan
Thackeray Shivsena: संजय राठोडांना पर्याय? बंजारा समाजाच्या 'या' मोठ्या नेत्याने बांधलं शिवबंधन

खडसेंच्या ‘सहकार’, महाजनांच्या ‘शेतकरी’त लढत

निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हवाटप झाले आहे. आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे ‘सहकार’ पॅनल असून, त्यांचे चिन्ह ‘विमान’ आहे, तर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट आघाडीचे शेतकरी पॅनल असून, त्यांचे चिन्ह ‘कपबशी’ आहे. या दोन्ही पॅनलच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी आता सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.