Jalgaon News : निंभोरात 40 दिवसांपासून वीज गायब; वीज वितरण विभागाची अशीही चालढकल

Jalgaon : वडगाव रस्त्यावरील शेत शिवारातील विजेच्या खांबावरील ॲल्युमिनिअम तार चोरट्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तोडून तुकडे करून लंपास केली.
Power Supply Off
Power Supply Offesakal
Updated on

Jalgaon News : येथील वडगाव रस्त्यावरील शेत शिवारातील विजेच्या खांबावरील ॲल्युमिनिअम तार चोरट्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तोडून तुकडे करून लंपास केली. तेव्हापासून म्हणजे साधारण ४० दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा गायब आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. (Jalgaon Power supply off in nibhora for 40 days)

चोरट्यांनी वडगाव रस्त्यावरील सूर्यभान भिरूड,लिलाधर भिरूड ते विलास भंगाळे यांच्या शेता दरम्यान असलेल्या शेतीच्या इलेक्ट्रिक पंपांसाठी कनेक्शनच्या पुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या वीजेच्या खांबावरील ॲल्युमिनिअमच्या ९०० मीटर लांबीची तारा लंपास केल्या.

तारांचे तुकडे करून चोरी केल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यानुसार इलेक्ट्रिक तंत्रज्ञ नीलेश नेमाडे यांच्या फिर्यादीवरून अंदाजे ९०० मीटर लांबीच्या चोरीबाबत १४ हजार रुपये नुकसानीची फिर्याद निलेश नेमाडे यांनी दिल्यावर चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र गुन्हा दाखल होऊन व तारा चोरी होऊन ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यावरही शेतकऱ्यांना वीज वितरण विभागाकडून अद्यापपर्यंत तारा उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. (latest marathi news)

Power Supply Off
Jalgaon Unseasonal Rain Damage : डोळ्यादेखतचं नुकसान.. हेलावणारं मन अन्‌ अस्वस्थता!

विशेष म्हणजे तळपत्या उन्हाने केळी बागेला पाणी देणे गरजेचे असताना वीज वितरण विभाग कमालीचा सुस्त असून शेतकऱ्यांची अवहेलना होत असल्याने केळीबागा करण्याची चिन्हे असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

"शेजारी असलेल्या शेतकऱ्यांकडून ४० दिवसांपासून पाणी घेतले असून आता ऊन तापायला लागल्याने त्यांना ही अडचणी येत आहे वीजवितरण विभागाने तातडीने उपाययोजना करून तारा उपलब्ध करून द्यायला हव्यात."- पुंडलिक भिरूड (केळी उत्पादक शेतकरी, निंभोरा) .

Power Supply Off
CM Shinde Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()