Ram Navami 2024 : जय श्रीरामांच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव! भाविकांची गर्दी

Jalgaon News : भजन गात पाळणा हलवून पुष्पवर्षाव करत प्रभू श्रीराम जन्मोत्सव शहरातील विविध श्रीराम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात बुधवारी (ता. १७) झाला.
Shri Ram Janmotsav was celebrated in Ram Mandir in city on Wednesday afternoon.
Shri Ram Janmotsav was celebrated in Ram Mandir in city on Wednesday afternoon.esakal
Updated on

Jalgaon News : ‘जय श्रीरामांचा गजर, राम जन्मला गं सखे... राम जन्मला..., असे भजन गात पाळणा हलवून पुष्पवर्षाव करत प्रभू श्रीराम जन्मोत्सव शहरातील विविध श्रीराम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात बुधवारी (ता. १७) झाला. जुने जळगावमधील श्रीराम मंदिर संस्थानमध्ये पहाटेपासून विविध धार्मिक झाले. श्रीरामांच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. (Jalgaon Prabhu Shri Ram Janmotsav in various Shri Ram temples in city)

सकाळी संस्कार भारतीच्या कलावंतांनी गीत रामायण सादर केले. सकाली दहा ते दुपारी बारापर्यंत कीर्तनकार श्रीराम महाराजांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. दुपारी जय जय श्रीरामांच्या गजरात पाळण हलवून श्रीरामाचा जन्मोत्सव करण्यात आला. महाआरती होऊन प्रसादवाटप झाले. गादीपती मंगेश महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

श्रीराम जन्मोत्सवानंतर दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली. सर्व भाविकांना मंगेश महाराजांनी पंजरीचा (सुंठवडा) प्रसाद दिला. सकाळी मंदिराचे विश्वस्त ॲड. सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, डॉ. विवेकानंद जोशी, डॉ. वीरेंद्र खडके, डॉ. तुषार राणे, विठ्ठल मंदिराचे विश्वस्त विलास चौधरी.

मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल गुरुजी, फडे गुरुजी, ठोसर गुरुजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय ठाकरे, विजय मोघे, राजप्रकाश भावसार, राजू कोळी आदींनी दर्शन घेतले. सायंकाळी साडेसहाला संध्या आरती होऊन जळगावनगरीतील ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रघोषात शांतिपाटाचा कार्यक्रम झाला. गुरुवारी (ता. १८) सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत गोपाळकाल्याचे भजन होईल. नंतर महानैवेद्य दाखवून आरती होईल. (Latest Marathi News)

Shri Ram Janmotsav was celebrated in Ram Mandir in city on Wednesday afternoon.
Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात पाणीटंचाई 42 गावांवरून 53 गावांत; उन्हाळ्याची तीव्रता

शहरातील चिमुकले श्रीराम मंदिर, जुने जळगावमधील श्रीराम मंदिरासह विविध श्रीराम मंदिरामंध्ये सकाळपासून काकड आरती, अभिषेक, भजन आदी कार्यक्रम झाले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात पहाटे पाचला काकड आरती झाली.

भगवंताचा पंचामृत, गंगा, गोदावरी, नर्मदा, कैलास मानसरोवर येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक सकाळी सातला करण्यात आला. दादा महाराज जोशी यांनी राम जन्माचे कीर्तन केले. दुपारी बाराला श्रीराम जन्मत्सोव झाला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, गृह पोलिस उपअधीक्षक प्रमोद पवार यांच्यासह भाविक उपस्थित होते.

१५० पंजिरीचा प्रसाद

चिमुकले राम मंदिरात १५० किलो पंजिरीचा प्रसाद तयार केला होता. यात १५० किलो धणे, २० किलो सुंठ पावडर, ३० किलो साखर, ३० किलो गूळ, ९० गायींचे तूप, एक किलो पंचखाद्य प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी सात ते दहा या वेळेत पाच हजार लाडू भाविकांना वाटप करण्यात आले.

पिंप्राळा मंदिरात जन्मोत्सव

पिंप्राळा येथील जुने प्रभू श्रीराम व बालाजी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव झाला. मंदिराचा गाभारा व पाळणा आकर्षक फुलांनी सजविला होता. पहाटे काकड आरती, अभिषेक होऊन दुपारी जन्मोत्सव झाला.

Shri Ram Janmotsav was celebrated in Ram Mandir in city on Wednesday afternoon.
Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने चोरवड येथे उचलले टोकाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.