Jalgaon News : प्रहार जनशक्ती विधानसभेच्या दोन जागा लढविणार; जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांची माहिती

Political News : जळगाव शहर विधानसभेसाठी चांगला उमेदवार मिळाल्यास ही जागाही पक्ष लढविणार आहे, अशी माहिती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Prahar Janshakti
Prahar Janshaktiesakal
Updated on

Jalgaon News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून तयारी सुरू असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर व भुसावळ या दोन मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. याशिवाय जळगाव शहर विधानसभेसाठी चांगला उमेदवार मिळाल्यास ही जागाही पक्ष लढविणार आहे, अशी माहिती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Jalgaon Prahar Janashakti to contest two assembly seats)

पद्मालय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटना प्रहार युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, महानगराध्यक्ष प्रवीण पाटील, राजेंद्र कुंवर, युवक तालुकाध्यक्ष सतीश सपकाळे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, पंकज पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजी सोनवणे यांनी सांगितले, की प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सांगितल्यानुसार जिल्ह्यात तयारी सुरू आहे. विधानसभेचे चित्र स्पष्ट झाल्यावर जळगाव जिल्ह्यातून किमान २ जागा लढविण्यात येणार आहेत.

त्यात रावेर- यावल मतदारसंघ व भुसावळ या दोन जागा निश्चित आहेत. रावेर-यावल मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी उमेदवार असणार आहेत, तर भुसावळ आणि जळगावसाठी प्रभावी उमेदवाराचा शोध सुरू आहे. तर जळगाव शहराचा अभ्यास करून जागा लढविण्याबाबत ठरविण्यात येणार आहे. (latest marathi news)

Prahar Janshakti
Jalgaon Political News: नगरसेवकांची दिशाभूल करून ‘अजेंड्या’वर घेतल्या स्वाक्षऱ्या! बोदवड ‘राष्ट्रवादी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

९ ऑगस्टला भव्य मेळावा

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे क्रांती दिवस अर्थात ९ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी, दिव्यांग, महिला, तरुण, वृद्धांच्या विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या आंदोलनाला दीड लाख समर्थकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे.

आंदोलनानंतर होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू मार्गदर्शन करतील. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी सोनवणे यांनी केले.

Prahar Janshakti
Jalgaon Political News : विधानसभेसाठी पाचपेक्षा जास्त इच्छुक; डॉ. बी. एस. पाटील : पत्रकार परिषदेत मंत्र्यांवर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.