Satpuda Forest : सातपुड्याच्या जंगलात वाघाचे अस्तित्व; वनपरीक्षेत्र अधिकारी भिलावे

Satpuda Forest : जंगल भ्रमंतीसाठी पाल येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावल पश्चिम वनक्षेत्राचे परीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी तालुक्यातील हरिपुरा येथील आश्रमशाळेत आयोजित वन्यजीव सप्ताहात दिली आहे.
Jungle Safari Forest Range Officer Bhilawe for trekking at Pal to see tiger existence in Satpura forest
Jungle Safari Forest Range Officer Bhilawe for trekking at Pal to see tiger existence in Satpura forestesakal
Updated on

यावल : तालुक्याच्या उत्तर सीमेवरील सातपुडा वनक्षेत्रात सातपुड्याच्या जंगलात वाघाचे अस्तित्व असून, जंगल भ्रमंतीसाठी पाल येथे जंगल सफारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावल पश्चिम वनक्षेत्राचे परीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी तालुक्यातील हरिपुरा येथील आश्रमशाळेत आयोजित वन्यजीव सप्ताहात दिली आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त यावल पश्चिम वनविभाग व वाईल्ड लॅण्डस् कंझर्वेशन फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ आक्टोबर दरम्यान सप्ताह साजरा करण्यात आला. ‘मानव-वन्यजीव संघर्ष निवारण’ तसेच ‘वने व वन्यजीव’ या विषयावर जनजागृती सभा घेण्यात आली. (presence of tiger in forest of Satpura should be feared by forest range officer )

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वाइल्ड लॅण्ड्स कंझर्वेशन फाउंडेशनचे संस्थापक अजिंक्य भांबुरकर यांनी वन्यजीव सप्ताह, जंगल, पर्यावरण, वन्यजीव आदीबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी भांडारकर यांनी माहिती देताना सांगितले, की वन्यदिन कधी सुरू करण्यात आला व त्याचा उद्देश काय व मानव-वन्यजीव संघर्ष म्हणजे काय?, गाव व जंगलाची भौगोलिक स्थिती कशी आहे, जंगल कसे कमी होत चालले आहे, आपण जंगलावर कसे निर्भर आहोत, वाघ-बिबटच्या हालचाली व त्यांच्या सवई काय आहेत, कुठल्या स्थितीमध्ये वाघ-बिबट मानवावर हल्ला करतो व मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये, यासाठीचे उपाय सांगण्यात आले.

त्यात जंगलातील नाले, पाणवठे, थंडाव्याच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, ज्या ठिकाणी वाघ-बिबटचे ठसे आढळले, त्या ठिकाणी जाण्यास टाळावे, अचानक वाघ-बिबटसमोर आल्यास त्याकडे पाठ न करता, हळूहळू मागे सरकून सुरक्षित अंतर ठेवावे, वाघ-बिबट शेतात गाव परिसरात आढळून आल्यास त्याचा पाठलाग करू नका व घेरू नका आदी उपयुक्त माहिती सांगून जर मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. (latest marathi news)

Jungle Safari Forest Range Officer Bhilawe for trekking at Pal to see tiger existence in Satpura forest
Forest Department : खिरेश्वर येथे वनविभागाच्या वतीने पर्यावरण शुल्क नाक्याची उभारणी

या जनजागृती कार्यक्रमाला उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगावचे जमीर शेख (भावसे), यावल वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील (भावसे) यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनपाल संजय इंदे, दीपक परदेशी, वनरक्षक सुधीर पटणे, अश्रफ तडवी, रविकांत नगराडे, अक्षय रोकडे, विलास तडवी, दीपक चव्हाण, योगेश मुंडे, योगेश सोनवणे यांनी कार्यक्रम पार पाडला.

वाघामुळे ‘सातपुडा’ समृद्ध

यावल पश्‍चिम वनक्षेत्राचे परीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी अन्न साखळीतील वरचा घटक वाघ हा आपल्या सातपुडा जंगलात असून, लोकांना त्याला पाहता यावा, जंगलात भ्रमंती करता यावी म्हणून पाल या ठिकाणी जंगल सफारी सुरू करण्यात आली असल्याचे सांगून जंगल कायम राहिले तर आपल्याला वाघ पाहण्यासाठी कुठेही जावे लागणार नसल्याचे सांगितले.

Jungle Safari Forest Range Officer Bhilawe for trekking at Pal to see tiger existence in Satpura forest
Tisangi Forest : तिसंगी जंगलात गर्भवती सांबराची शिकार करून केला शिरच्छेद, निवडेतील पाच जणांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.