Flower Rate Hike : श्रीगणेशोत्सवाच्या पर्वाला शनिवारपासून (ता.७) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून फुलांसह फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच आवक कमी झाल्याने फळे व फुलांच्या दरात दुपटीने वाढ झालेली आहे. त्यात निशिगंधाचा दर ६००वरून १,२०० रुपयांवर गेला आहे. श्रीगणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी गेल्या चार-पाच दिवसांपासून हरितालिका पूजन, सार्वजनिक व घरगुती गणपती मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी, गौरीपूजनासाठी विविध प्रकारची फुले, हार, पूजा व सजावटीची फुले-फळांना मागणी वाढली. (price of Nishigandha flowers increased from Rs 600 to Rs 1200 )