Jalgaon Bribe Crime : निपाणे येथील मुख्याध्यापक संदीप महाजन लाच घेतल्याप्रकरणी ‘एसीबी’च्या जाळ्यात

Bribe Crime : मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांना त्यांच्याच विद्यालयातील शिपायाकडून वेतन पथकातील थकीत बिल काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
Sandeep Mahajan
Sandeep Mahajanesakal
Updated on

Jalgaon Bribe Crime : तालुक्यातील निपाणे येथील संत हरिहर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांना त्यांच्याच विद्यालयातील शिपायाकडून वेतन पथकातील थकीत बिल काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (ता. २७ )अटक करण्यात आली. शिपायाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकास त्यांच्या कार्यालयात अटक करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Principal Sandeep Mahajan of Nipane is arrested by ACB for taking bribe)

याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जळगाव येथील कार्यालयात चौकशीकामी मुख्याध्यापकास नेण्यात आले आहे. या घटनेतील तक्रारदार तथा निपाणे येथील संत हरिहर माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी किशोर धर्मराज पाटील यांनी मागील प्रलंबित वेतननिश्चिती थकीत फरकाच्या बिलाची रक्कम दोन लाख ५३ हजार ७८० रुपये निश्चित करण्याचा प्रस्ताव जळगाव येथील माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता.

Sandeep Mahajan
Jalgaon Bribe Crime : लाचखोरीत पोलिस हवालदार अखेर निलंबित

या प्रस्तावाच्या मंजुरीचे काम मुख्याध्यापक महाजन यांनी स्वतःच्या ओळखीने करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून मंजूर रकमेच्या पाच टक्के म्हणजेच १२ हजार ५०० रुपये लाच देण्याची मागणी मुख्याध्यापक महाजन यांनी शिपाई पाटील यांच्याकडे केली. याबाबत किशोर पाटील यांनी २५ जूनला जळगाव येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीनंतर वेतननिश्चिती रक्कम रुपये दोन लाख ५३ हजार ७८० रुपयांचे पाच टक्केप्रमाणे रुपये १२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम होती. तडजोडीनंतर दहा हजार रुपयांत तो सौदा मान्य करण्यात आला. म्हणून दहा हजार रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक महाजन यांनी शिपाई पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार गुरुवारी मुख्याध्यापक महाजन यांना त्यांच्याच कार्यालयात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी पकडले.

Sandeep Mahajan
Jalgaon Bribe Crime : राजुरा ग्रामसेवकासह शिपाई ‘एसीबी’ च्या जाळ्यात; फेरफार नाव लावण्यासाठी घेतली 6 हजारांची लाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.