Jalgaon Prisoner Murder Case: खुनाच्या घटनेला कारागृहातील निष्काळजीपणा कारणीभूत! विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून झाडाझडती

Jalgaon News : या प्रकरणी तुरुंगरक्षक गोपाळ पाटील यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तत्काळ निलंबित करण्यात आले असून, उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येत आहे.
Special Inspector General of Police Dr. Jalander Supekar.
Special Inspector General of Police Dr. Jalander Supekar.esakal
Updated on

Jalgaon Prisoner Murder Case : जळगाव जिल्‍हा उपकारागृहात बुधवारी (ता. १०) बंदिवान मोसीन खान याचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. कारागृहातील स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे खुनासारखा गंभीर प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी तुरुंगरक्षक गोपाळ पाटील यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तत्काळ निलंबित करण्यात आले असून, उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येत आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गुरुवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जळगाव जिल्‍हा उपकारागृहात विभक्त कोठडीत बॅरेक ४ मध्ये झोपलेला असताना मोसीन खान या कैद्यावर त्याचाच सहकारी बंदिवान शेखर मोघे याने बुधवारी धारदार चाकूने गळा चिरून आणि छातीत चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली होती. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मारेकरी शेखर मोघे याला ताब्यात घेण्यासाठी जिल्‍हापेठ पोलिसांनी भुसावळ न्यायालयालयात अर्ज सादर केला आहे. शुक्रवारी (ता. १२) त्याचा अधिकृत ताबा मिळणार आहे. घटना घडल्यानंतर प्राथमिक चौकशीत त्याने चाकू कारागृहात कसा आला, त्याने तो कुठे लपवून ठेवला, चार दिवस कशी पाळत ठेवली याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांच्यासमक्ष दिली होती.

त्यांच्या जेलमधील साहित्याची आणि बॅरेकची तपासणी केल्यावर एक कटरदेखील मिळून आले होते. सकाळी आठपूर्वी घटना घडली तेव्हा तुरुंगरक्षक गोपाळ पाटील यांची या बॅरेकवर ड्यूटी होती. आरडाओरडा सुरू झाल्यानंतर ते धावूनही गेले, तोपर्यंत बंदिवान मोसीन खानचा मृत्यू झालेला होता. हा सर्व घटनाक्रम कारागृह प्रशासनातर्फे कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी वरिष्ठांना सादर केला होता. (latest marathi news)

Special Inspector General of Police Dr. Jalander Supekar.
Nashik Crime News : अपघात करून पसार मद्यतस्कर हजर; एक्साइज वाहन अपघात प्रकरण

कारागृहाची पाहणी

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर गुरुवारी कारागृहाची पाहणी करण्यासाठी जळगाव येथे आले होते. डॉ. सुपेकर यांनी घटना घडली त्या विभक्त कोठडीतील बॅरेक ४ व ३ ची पाहणी केली. कारागृहात कैद्यांमध्येच काही ज्येष्ठ कैद्यांना सुरक्षा देखभालीची ड्यूटी दिली जाते. त्यांची चौकशी करण्यात आली.

जेलबंदी सोडण्याची वेळ, घटना घडली ती वेळ आणि कर्तव्‍यावर हजर तुरुंग क्षक गोपाळ पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कारागृहातील कागदपत्रांच्या तपासणीनंतर कारागृहाच्या भिंती, बॅरेकची अवस्था आदी बाबींची चौकशी करण्यात आल्याचे डॉ. सुपेकर यांनी सांगितले.

"घटना घडली त्या वेळी गोपाळ पाटील कर्तव्यावर होते. त्यांची ड्यूटी बॅरेकवर लावण्यात आली होती. जर ते तेथे हजर असते तर कदाचित खुनाची घटना टळली असती, असे स्पष्ट झाल्यावरून गोपाळ पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, जबाबदार इतर कर्मचारी व अधिकारी यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे."

- डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक

Special Inspector General of Police Dr. Jalander Supekar.
Nashik Crime News : येवल्यातील त्या युवकावर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com