Bhusawal MSRTC Depot : भुसावळ बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

MSRTC Depot : बसस्थानकात प्रवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.
Dilapidated condition of bus station premises due to lack of asphalting. Water tank not in use due to lack of water tank maintenance.
Dilapidated condition of bus station premises due to lack of asphalting. Water tank not in use due to lack of water tank maintenance.esakal
Updated on

भुसावळ : शहरातील मध्यवर्तीय रेल्वेस्थानकाच्या शेजारी असलेल्या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचा अभाव, शौचालयाची दुर्दशा, धुळीने माखलेले अंतर्गत रस्ते, पडून असलेला कचरा, बस वाहतुकीमुळे उडणारी धूळ, आसनांअभावी उन्हात थांबले प्रवासी, भिंती आडोशाला आलेली झाडेझुडपे, चांगले सुसज्ज जाणुनबुजून कालबाह्य केलेले जलकुंभ, हे चित्र आहे. सतत गजबजलेल्या येथील बसस्थानकात प्रवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. ( problem for drinking water at Bhusawal Bus Stand to bus passenger )

शिवाय, अनेक समस्यांच्या गर्तेत भुसावळचे बसस्थानक अडकल्याचे दिसून येत आहे. भुसावळ हे मध्यवर्ती आणि तालुक्याचे शहर आहे. येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासह ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता बसस्थानकाची उभारणी रेल्वेस्थानकाशेजारी करण्यात आल्याचे जुने जाणकार सांगतात. स्थानिक प्रवाशांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे.

असे असताना शहरातील बसस्थानकात सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र स्थानिक एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चागल्या दर्जाचा जलकुंभाची नोंद दप्तरी कालबाह्य होऊन कोंडला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने वणवण फिरावे लागत आहे.

सार्वजनिक नळ आणि इतर कोणतीही पाण्याची व्यवस्था नसल्याने अबालवृद्धांसह सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकात आसनव्यवस्था आहे. पंख्यांची स्थिती असून नसल्यासारखी आहे. आसनांची दुर्दशा झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्या तुलनेत निवारा थांबे आणि आसने कमी पडत आहेत. बसस्थानकाची इमारत जुनी झाल्याने इमारत, भिंती आणि स्लाॅबच्या प्लास्टरला तडे पडल्याने प्रवासी जखमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बसस्थानकात उभारलेल्या शौचालयाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांची कुचंबना होताना दिसत आहे. प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात कचऱ्याचा ढिगारा असून, प्रवासी त्यावरच लघुशंका करीत असल्याने व बस स्थानक सुरक्षाभिंती आड झाडेझुडपे वाढल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (latest marathi news)

Dilapidated condition of bus station premises due to lack of asphalting. Water tank not in use due to lack of water tank maintenance.
Manmad MSRTC Depot: प्रवाशांची सेवा कमी गैरसोयीच अधिक! राज्य परिवहन महामंडळाने गौरविलेले हेच का ते सुंदर स्वच्छ बसस्थानक?

पाइंटर स्वरूपात बसस्थानकातील समस्या

- बसस्थानकातील फलाटांची दुर्दशा

- अंतर्गत भाग धुळीने माखला

- प्रवाशांचा श्र्वास धुळीने कोंडला

- परिसरात सर्वत्र अस्वच्छता

- शौचालयाजवळ प्लास्टिक कचरा

- झाडेझुडुपे वाढली; डासांचा प्रादुर्भाव

पोलिस चौकी, हिरकणी कक्ष बंद

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी उभारण्यात आली. परंतु अनेक वर्षांपासून ही चौकी बंद अवस्थेत धूळखात आहे. त्यामुळे बसस्थानकात जीवघेणे हल्ले, चोऱ्या, महिलांचे मंगळसूत्र हिसकावणे अशा गंभीर स्वरुपाच्या घटना घडतात. नवजात बालक आणि स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू केला होता. या हिरकणी कक्षाला कुलूप लावून बंद करण्यात आले आहे.

Dilapidated condition of bus station premises due to lack of asphalting. Water tank not in use due to lack of water tank maintenance.
Jalgaon MSRTC Depot : बसपोर्टची प्रतीक्षाच; ‘पे ॲंड पार्क’ही बंद! जळगाव बसस्थानक अडकले असुविधांच्या गर्तेत

''बसस्थानक आवार डांबरीकरणाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, झाडेझुडपे दर तीन महिन्यांनी स्वच्छ केले जातात. पावसामुळे झुडपांचे प्रमाण वाढले आहे. शौचालयात स्वच्छता नेहमी ठेवली जाते. मात्र प्रवासी कालबाह्य केलेली जुन्या शौचालयाचा वापर करीत आहेत. त्यांनी नवीन शौचालयांचा वापर करावा. बसस्थानकात कुठल्याही समस्या निर्माण झाल्यास तत्काळ निरसन केले जाते. आता उपस्थित झालेल्या समस्या देखील लवकरच दूर होतील.''- राकेश शिवदे, भुसावळ आगारप्रमुख

प्रवासी म्हणतात..

''भुसावळ बसस्थानक सर्वांना सोईस्कर आहे. मात्र सुविधांची वानवा आहे. पिण्याचे पाणी, महिलांना चांगली शौचालय व्यवस्था अपेक्षित आहे. बसस्थानकात दररोज साफसफाई करणे गरजेचे आहे.''- सुशील सपकाळे, प्रवासी, भुसावळ

''राज्य शासनाने प्रवासी महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे. मात्र या सोबत बसेसची संख्या देखील वाढविणे गरजेचे असताना बसच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे अवश्यक आहे. त्यांची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.''- करूणा चव्हाण, प्रवासी, भुसावळ. (latest marathi news)

Dilapidated condition of bus station premises due to lack of asphalting. Water tank not in use due to lack of water tank maintenance.
Jalgaon MSRTC Depot: चोपडा आगार राज्यात प्रथम; सर्वाधिक उत्पन्नात अव्वल! उत्कृष्ट कामगिरीचे झाले मूल्यमापन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.