Jalgaon Parking Problem : जळगावात पार्किंगच्या समस्येला जोर; जिथे गरज नाही तिथे पोलिस दादा..!

Latest Jalgaon News : बहिणाबाई उद्यानाकडून रिंगरोडकडे जाताना महेश मार्गावर कॉर्नरवर काही वेळा वाहतूक पोलिस दिसून येतात.. विशेषत: विना परवाना वाहन चालविणाऱ्या शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरील कारवाईसाठी ते असतात..
traffic police
traffic policeesakal
Updated on

शहरातील एकूणच वाहतुकीच्या समस्येबाबत आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची गरजच नाही, त्या ठिकाणी ते उभे असल्याचे दिसून येते. सागरपार्कसमोरील पेट्रोलपंपालगत चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईसाठी याठिकाणी अधूनमधून दोघे पोलिस नियुक्त असतात.

महिनाभरातून दोन- चार दिवस ही कारवाई चालते.. नंतर थंडावते. नवीन बस स्थानकाजवळही एक नव्हे तर तीन-चार वाहतूक पोलिसांची कायम ड्यूटी असते. वस्तूत: या ठिकाणी वाहतूक शाखेसह पोलिस अधीक्षकांचे कार्यालय आहे.

म्हणूनच वाहतूक पोलिस असतात, पण.. या जागेवर एक- दोन पोलिस असले तरी काम चालू शकते. बहिणाबाई उद्यानाकडून रिंगरोडकडे जाताना महेश मार्गावर कॉर्नरवर काही वेळा वाहतूक पोलिस दिसून येतात.. विशेषत: विना परवाना वाहन चालविणाऱ्या शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरील कारवाईसाठी ते असतात.. (Jalgaon problem of parking)

या ठिकाणी कायम हवेत पोलिस दादा

जो वाहतूक कोंडी आणि अपघाताचा ‘ब्लॅक स्पॉट’ आहे, त्या आकाशवाणी चौकात पोलिस काही वेळेस दिसून येत नाही. खरेतर या चौकात सकाळी ८ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत कायम स्वरुपी प्रत्येक कॉर्नरला एकेक असे किमान चार वाहतूक पोलिस तैनात हवेत.. टॉवर चौकात दिवसभर वाहतूक कोंडी असते.

नव्याने सिग्नल यंत्रणा लावल्यानंतर या चौकातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. तरीही याठिकाणी किमन दोन पोलिस कायम नियुक्तीस हवे. चित्राचौकासह पुढे नेरीनाका चौकातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांची ड्युटी आवश्‍यक आहे. (latest marathi news)

traffic police
Jalgaon Parking Problem: शहरातील रस्ते...नव्हे, वाहनतळच! प्रमुख मार्गांवर बेशिस्त पार्किंगचा भार; महापालिका प्रशासनाची चिरनिद्रा

वाहन जप्तीने नुकसान अधिक

‘नो पार्किंग झोन’चा शहरात पत्ता नाही. काही ठिकाणी असेलही, पण त्याठिकाणी त्यासंबंधी नियमाची अंमलबजावणी नाही. अचानक वाहतूक पोलिसांना रस्त्यावरील पार्किंगबाबत जाग येते आणि कारवाई सुरु होते.. सहसा या कारवाईत वाहनधारकांना दंड केला जातो. पण, ज्यांची वाहने रस्त्यावर उभी आहेत, ती उचलून नेल्यानंतर तो दंड आकारला जातो.

वाहने उचलून नेताना वाहनांचे नुकसान होते. कार असेल, आणि ‘टो’ करुन न्यायची असेल तर नुकसानीचा धोका जास्तच असतो. शिवाय, वाहन जप्तीसाठी मोठी यंत्रणा लागते, वाहनांच्या वाहतुकीसाठी आयशर लागते.. त्याचा भारही वाहतूक शाखेकडून सोसवत नाही.. वाहनधारकांना नाहक मन:स्ताप होतो.. म्हणून या कारवाईतही सातत्य नाही.

traffic police
Laxman Hake: संभाजी राजेंनी माझ्या अंगावर माणसे घातली, ६, ७ वाजता कोण दारु पितं? लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.