Bahinabai Chaudhary Award: बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी 9 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले! NMU तर्फे संस्था, व्यक्तीचा होणार गौरव

Jalgaon News : गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठातर्फे राज्य पातळीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार दिला जातो.
kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University
kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra Universityesakal
Updated on

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिला जाणारा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार’ या वर्षी महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून, त्यासाठी ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रस्ताव मागविले आहे. (jalgaon Proposals invited till August 9 for Bahinabai Chaudhary Award)

गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठातर्फे राज्य पातळीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार दिला जातो. ५१ हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक, कृषी, शिक्षण आणि साहित्य हे चार क्षेत्र पुरस्कारासाठी निश्चित केले आहेत. पैकी या वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणार आहे.

हे करू शकणार अर्ज

शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारी व्यक्ती अथवा संस्था, ज्यांनी मूल्याधिष्ठीत शिक्षणसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच नावीन्यपूर्ण शिक्षणप्रणाली विकसित केली आहे, त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. ९ ऑगस्टपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी अर्ज असे लिफाफ्यावर नमूद करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पत्रपेटी क्रमांक ८०, जळगाव, जिल्हा जळगाव- ४२५ ००१ या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत. (latest marathi news)

kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University
Jalgaon News: वसतिगृहाची 30 टक्के शुल्कवाढ 15 टक्क्यांवर! NMU व्यवस्थापन परिषदेचा निर्णय; बृहत आराखडा शिफारसींनाही मान्यता

असे आहेत निकष

पुरस्कारासाठी व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील असावी. व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे वय ४० वर्षांपेक्षा कमी नसावे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या क्षेत्रात काम केलेले असावे. संस्था असेल तर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या संस्थेचे कार्यही १५ वर्षांपेक्षा अधिक असावे.

याठिकाणी माहिती उपलब्ध

राज्य पातळीवरील या पुरस्काराची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली असून, त्यात विहीत नमुन्यातील अर्ज, पात्रता, नियमावली देण्यात आली आहे. तज्ज्ञ निवड समितीकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी होऊन पुरस्कार जाहीर केले जातील.

विशेष परिस्थितीत पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावाव्यतिर‍िक्त इतर योग्य व्यक्ती अथवा संस्थेचाही विचार केला जाऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी या पुरस्कारासाठी मुदतीच्या आत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.

kaviyitri Bahinabai Chowdhury Entrance of North Maharashtra University
Majha Ladka Bhau Yojana : ‘माझा लाडका भाऊ योजने’साठी आता तरुण रांगेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.