Jalgaon Crop Insurance : पीकविमा मिळत नसल्याने जळगावात विमा कंपनीच्या कार्यालयाला ‘शेण’

Jalgaon Crop Insurance : राज्य शासनाने जो २३ फेब्रुवारीचा शासन निर्णय काढला होता त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आज त्या निर्णयाच्या पत्राची केळी पीकविमा कंपनीच्या ऑफिस समोर होळी करण्यात आली.
Protest by hitting the insurance company's office with 'dung'
Protest by hitting the insurance company's office with 'dung'esakal
Updated on

Jalgaon Crop Insurance : राज्य शासनाने जो २३ फेब्रुवारीचा शासन निर्णय काढला होता त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आज त्या निर्णयाच्या पत्राची केळी पीकविमा कंपनीच्या ऑफिस समोर होळी करण्यात आली. कंपनीचे अधिकारी नसल्याने कार्यालयाला शेण लावून निषेधही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. (Jalgaon protest front of office of Banana Crop Insurance Company as crop insurance money was not received)

शिवकॉलनी बस थांब्याजवळ पीक विमा कंपनीचे अधिकारी नसल्याने त्यांच्या कार्यालयाला शेण मारण्यात आले. पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे, हे सरकार व्यापारी लोकांचे आहे यांना शेतकरी प्रश्नांविषयी काहीही देणे घेणे नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली

आज पीकविमा कंपनीच्या ऑफिसला शेण मारतो आहे, येणाऱ्या काळात मंत्री, आमदार, खासदार यांच्या तोंडावर शेण मारण्याचे काम आता शेतकरी करणार आहे. (latest marathi news)

Protest by hitting the insurance company's office with 'dung'
Jalgaon News : सातपुड्यात सोमवार पासून भोंगऱ्या बाजाराची धामधूम

शेतकरी वर्गाला सोबत घेऊन मंत्री,आमदार, खासदार यांना गावबंदी करण्यात येणार आहे असा इशारा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगांव ग्रामीणचे उप जिल्हाप्रमुख प्रा. सोनवणे यांनी दिला आहे.

शासन निर्णयाची होळी

आंदोलकांनी यावेळी शासनाचा निषेध करीत, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णय फसवा असल्याचा आरोप करीत, शासन निर्णयाची होळी केली. सत्ताधारी मंडळींना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी काही देणे घेणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याचा उद्रेक आंदोलकांनी मांडला.

संदीप चौधरी, डॉ.रमाकांत कदम, आबा कोळी, छगन खडसे, संजय मराठे, मुकेश पाटील, विनोद सपकाळे, विकास पाटील, दामू कुंभार, संजय कोळी, विजय लाड, अविनाश पाटील, सचिन चौधरी, किरण ठाकूर व शिवसैनिक उपस्थित होते.

Protest by hitting the insurance company's office with 'dung'
Jalgaon News : नागझिरी पुलाचे काम सुरू होण्याआधीच थांबले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.