Jalgaon Bribe Crime : लाचखोर तलाठीसह पंटर ताब्यात! उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी मागितले हजार रुपये

Latest Crime News : दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Subhash Waghmare & Sharad Koli
Subhash Waghmare & Sharad Koliesakal
Updated on

पारोळा : शेतीच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी एक हजार रुपयाची लाच मागणाऱ्या चोरवड (ता. पारोळा) येथील तलाठ्‍यासह त्याच्या पंटरला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Punter arrested with briber Talathi)

याबाबत माहिती अशी, लोणी बुद्रूक (ता. पारोळा) येथील तक्रारदार यांची व त्यांच्या कुटुंबीयच्या नावे गावातच साडेसहा एकर शेत जमिन आहे. या शेत जमिनीवर तक्रारदाराने गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमधून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, आपल्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे आवश्यक होते.

त्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४) यांची चोरवड येथील कार्यालयात ४ सप्टेंबरला भेट घेतली. त्यांच्याशी या कामासंदर्भात चर्चा केली. त्यावर तलाठी वाघमारे यांनी तक्रारदाराला सांगितले, की सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात चार उताऱ्याचे प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे आठशे रुपये व मागील कामाचे दोनशे असे एकूण एक हजार रुपये द्यावे लागतील. (latest marathi news)

Subhash Waghmare & Sharad Koli
Jalgaon Bribe Crime News : खडकदेवळाच्या सरपंचास लाच स्वीकारताना अटक

त्यावर तलाठीचा पंटर शरद कोळी याने या लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाचेची रक्कम त्याच्या फोन पे अकाउंटवर टाकण्यासाठी वेळोवेळी तगादा लावला. याबाबत शेतकऱ्याने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. ३०) तलाठी सुभाष वाघमारे व त्याचा पंटर शरद प्रल्हाद कोळी (वय ४३, रा. चोरवड) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Subhash Waghmare & Sharad Koli
Nandurbar Bribe Crime : कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना अटक; घरकुल हप्त्यासाठी घेतले 2 हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.