Jalgaon News: लोकवर्गणीतून केली स्मशानभूमीसाठी जागेची खरेदी! सोनबर्डी, हणमंतखेडे बुद्रुक येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पुढाकार

Jalgaon News : ही जागा खरेदी करण्यासाठी पराग इरिगेशनचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी विधानसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुख पराग पवार यांच्यासह युवकांनी प्रयत्न केले.
Entrepreneur Parag Pawar and villagers giving cash to the farmer.
Entrepreneur Parag Pawar and villagers giving cash to the farmer.esakal
Updated on

एरंडोल : गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तालुक्यातील सोनबर्डी व हणमंतखेडे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी लोकवर्गणीतून सुमारे पाच लाख ७५ हजार रुपयांची २० गुंठे जागा खरेदी केली. त्यातून ग्रामीण भागातील जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. ही जागा खरेदी करण्यासाठी पराग इरिगेशनचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी विधानसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुख पराग पवार यांच्यासह युवकांनी प्रयत्न केले. (Jalgaon Purchase of land for cemetery through public registration)

सोनबर्डी व हनमंतखेडा बुद्रुक या गावांत स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारप्रसंगी ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पाउस आल्यास ग्रामस्थांची तारांबळ उडते. गावालगत असलेल्या

नदीकाठावरील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागते. त्यामुळे गावात स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करीत होते. मात्र, शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पराग इरिगेशनचे संचालक पराग पवार यांनी पुढाकार घेत दोन्ही गावांत स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करून बांधकाम करण्याची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली.

त्यास ग्रामस्थांसह युवकांनी पाठिंबा देवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. पराग पवार यांनी सोनबर्डी व हणमंतखेडे बुद्रुक या दोन्ही गावांतील स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करता यावी, म्हणून प्रत्येकी ५१ हजार रुपये असे एक लाख दोन हजार रुपये रोख दिले. सूर्यकांत पाटील यांनी सोनबर्डी येथील स्मशानभूमीची जागा खरेदीसाठी ६१ हजार रुपये दिले.

विठ्ठल केशव पाटील, विजय विश्वास पाटील, प्रकाश उत्तम पाटील, श्रावण पितांबर पाटील, राजेंद्र भागावत पाटील यांच्यासह युवकांनी गावात घरोघरी जाऊन वर्गणी जमा केली. ग्रामस्थांनीही जागा खरेदीसाठी सहकार्य करून सुमारे सहा लाख रुपये जमा करून आदर्श उभा केला. (latest marathi news)

Entrepreneur Parag Pawar and villagers giving cash to the farmer.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टँकरवर १४७ कोटींचा खर्च; ‘जलजीवन मिशन’ योजनेचं काय

जागा खरेदीसाठी लागणारी रक्कम जमा झाल्यानंतर ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या नदीजवळील जागा निच्छित करून जागामालक कपूरचंद गंभीर पाटील व दीपक गंभीर पाटील यांच्याशी संपर्क साधून स्मशानभूमीसाठी जाग देण्याचे सांगितले.

कपूरचंद पाटील यांची दहा गुंठे जागा हणमंतखेडा बुद्रुकच्या स्मशानभूमीसाठी तर दीपक गंभीर पाटील यांच्या मालकीची दहा गुंठे जागा सोनबर्डी गावाच्या स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीच्या नावावर खरेदी करण्यात आली. सोनबर्डी व हनमंतखेडा बुद्रुक येथे ग्रामस्थांनी जागेच्या खरेदीसाठी लोकवर्गणी करून ग्रामपंचायतीच्या नावावर जागेची नोंदणी करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

"गावासाठी स्मशानभूमी असावी, अशी संकल्पना दोन वर्षांपासून मनात होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने ही संकल्पना आता पूर्ण होत आहे. जागेची खरेदी झाली आहे. शासनाच्या माध्यमातून स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. स्मशानभूमी होणार असल्याने अंत्यसंस्कार करताना होणारी गैरसोय आता दूर होणार आहे."

- पराग पवार, संचालक, पराग इरिगेशन, एरंडोल.

Entrepreneur Parag Pawar and villagers giving cash to the farmer.
Ladki Bahin Yojana: दाखला काढण्यासाठी लाडक्या बहिणीसह जावई सासुरवाडीत! पाहुणचारात गुंतले नातेवाईक; शासकीय लाभासाठी धावपळ सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.