Jalgaon Agriculture News : परतीच्या पावसाने खरिपातील कापूस, सोयाबीनचे नुकसान झाले असले, तरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. मागील महिन्यात शहरासह जिल्ह्यात भोकरबारी वगळता ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणारे लहान-मोठे प्रकल्प एकापाठोपाठ पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग केला जात आहे. एरंडोल तालुक्यातील पळासदड येथील अंजनी मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. (Rabi seaon worries over with return of rain)
जिल्ह्यात गिरणा, हतनूर, वाघूर असे तीन मोठे, तसेच १४ मध्यम आणि ९६ लघु प्रकल्प आहेत. यात गिरणा, हतनूर आणि वाघूर, तसेच अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी प्रकल्प सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने पूर्ण भरल्याने विसर्ग केला जात आहे.
अंजनी प्रकल्पातून विसर्ग
अंजनी प्रकल्प रविवारी (ता. २९) १०० टक्के भरल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून अंजनी नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा व परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी मॉन्सूनदरम्यान गिरणा प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याने अंजनी प्रकल्प ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरण्यात आला.
त्यानंतर अंजनी नदीचे उगमस्थळ आणि प्रकल्प परिसरात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली. जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग केला जात आहे.
सर्वच प्रकल्प ओसंडले
जिल्ह्यातील गिरणा, वाघूर १०० टक्के, तर हतनूर आदी मोठ्या प्रकल्पात ९३.७५ टक्के, तर मोर, अभोरा, मंगरूळ, सुकी, बोरी, तोंडापूर, अग्नावती, हिवरा, अंजनी, मन्याड आदी प्रकल्प १०० टक्के भरले असून, या प्रकल्पातून विसर्ग केला जात आहे. पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पात ८१.७३ आणि भोकरबारी ७.२७ टक्के असा एकूण ८९.४५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी केवळ ५९.६९ टक्के उपयुक्त जलसाठा होता, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. (latest marathi news)
रब्बीसाठी होणार फायदा
अंजनी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून, रब्बी हंगामातील पिकांसाठी या प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनाचा फायदा होणार आहे. सुमारे आठशे हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळत असून, धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास अंजनी नदीपात्रातून पाणी सोडण्यात येते.
अंजनी प्रकल्पासह पद्मालय, भालगाव व खडकेसीम येथील तलावांमध्येही जलसाठा झाल्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनपूर्वी अंजनी प्रकल्पातील जलसाठा संपल्यामुळे प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाची खोली वाढण्यास मदत झाली आहे.ठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.