जळगाव : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा दमदार पाऊस झाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच बहुतांश शेतकरी रब्बी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत. यावर्षी समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात सरासरी पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून आता पहाटेच्या वेळी मात्र, धुक्याची चादर व दव पडत असल्याने वातावरणात गारठा जाणवत आहे. (Rabi seeding will be done on fifty three lakh hectares in district )