पारोळा : ‘नमस्कार श्रोते हो... हे आकाशवाणीचे टिंबटिंब केंद्र आहे. सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे आणि बारा सेकंद झाले आहेत. आता ऐकू या मराठी भक्ती संगीत...’ हे कानी पडल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरु होत नव्हता. इतकी कधी काळी रेडिओ ऐकण्याची ‘क्रेझ’ होती. कालांतराने रेडिओची जागा टीव्हीने घेतली. त्यानंतर मोबाईलने तर जणू क्रांतीच केली आहे. त्यामुळे जग डिजीटल होत चाललेले असताना या डिजीटल युगात रेडिओ कालबाह्य होताना दिसत आहे. (Radio becoming obsolete in digital age)