Jalgaon News : मध्य रेल्वेने सर्व पॅन्ट्रीकारमधील कर्मचाऱ्यांना सर्व रेल्वेगाड्यांमधील स्वच्छता ठेवण्याबाबच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली जाणार असल्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अवध-आसाम रेल्वे एक्स्प्रेसमधील नुकत्याच झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (Railway food vendors ordered to follow rules of administration)
गेल्या ११ जुलै रोजी अवध आसाम एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमधून कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट लावल्याबद्दल एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी त्वरित निर्णायक कारवाई केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिनसुकिया विभागाचे डीआरएम, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) सोबत तात्काळ समन्वय साधून यातील संबंधित परवानाधारकावर १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
याव्यतिरिक्त सर्व गाड्यांवर स्वच्छता प्रोटोकॉलचे सक्तीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक इशारा देण्यात आला आहे. शिवाय, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या पूर्वमध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सहकार्याने केलेल्या प्रयत्नात या गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी जलद कारवाई करण्यात आली. पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सोबतच जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी व भविष्यात अशा वर्तनास प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)
तक्रार देण्याबाबत प्रवाशांना आवाहन!
रेल्वे प्रशासन सर्व गाड्यांमध्ये स्वच्छता व शिस्त यांचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्वांसाठी स्वच्छ व सुरक्षित प्रवासी वातावरण सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या समर्पणाची पुष्टी करून, प्रवाशांना व भागधारकांना अशा कोणत्याही घटनांची त्वरित निवारणासाठी तक्रार करणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते.
स्वच्छतेची खात्री करण्याच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा अशा कोणत्याही घटना घडल्यास त्यांची तक्रार तात्काळ नोंदवावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनाही स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.