Jalgaon News : भुसावळ विभागातील स्थानकांचा होणार पुनर्विकास

Jalgaon : भुसावळ विभागातील दहा रेल्वे स्थानकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी नुकतीच केली.
Railway Station (file photo)
Railway Station (file photo)esakal
Updated on

Jalgaon News : भुसावळ विभागातील दहा रेल्वे स्थानकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी नुकतीच केली.

भुसावळ विभागातील १० रेल्वे स्थानकांसह ६८ रोड अंडरपासची पायाभरणी, उद्‌घाटन आणि राष्ट्रार्पण करण्यात आले. भुसावळ विभागातील खंडवा, मूर्तिजापूर, देवळाली, नांदुरा, नांदगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा स्थानके या योजनेंतर्गत पुनर्विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत. (Railway stations in Bhusawal division will be redeveloped)

रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी अनेकदा भर दिला आहे. या प्रयत्नातील एक मोठे पाऊल म्हणून, पंतप्रधानांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी केली आहे. संबंधित स्थानकांसाठी अमृत खर्चासह योजना आणि अंदाज तयार केले आहेत.

रावेरसाठी ९ कोटी २२ लाख, सावदा स्टेशनसाठी ८ कोटी ५१ लाख, पाचोरा २७ कोटी ६७ लाख, मूर्तिजापूरसाठी १२ कोटी ९६ लाख, देवळालीसाठी १० कोटी पाच लाख, नांदुरा १० कोटी ६३ लाख, नांदगाव १० कोटी ६ लाख, धुळ्यासाठी ९ कोटी ४९ लाख, लासलगाव १० कोटी ५ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी गतीशक्ती युनिटकडे सोपविण्यात आली आहे. भुसावळ विभागातील दहा स्थानकांवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (latest marathi news)

Railway Station (file photo)
Jalgaon News : जळगावमध्ये आजपासून महासांस्कृतिक महोत्सव

खासदार आणि आमदार, स्वातंत्र्यसैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक आणि पोस्ट ऑफिसचे अधिकारी आणि शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था इत्यादी संबंधित स्थानकांवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.

संबंधित शहरातील विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्टेशन नंतरच्या पुनर्विकासाच्या नियोजित स्वरूपाचे चित्रण करणारे दृकश्राव्य देखील सर्व स्थानकांवर दाखविण्यात आले. रावेर येथे खासदार रक्षा खडसे, पाचोरा येथे खासदार उन्मेष पाटील, शिरसोली स्टेशन येथे आमदार सुरेश भोळे, मंडळ रेल प्रबंधक इति पाण्डे आदी अधिकारी उपस्थित होते.

Railway Station (file photo)
Jalgaon Unseasonal rain Damage : मेहुणबारे परिसरात अवकाळीचा कहर; गारपिटीमुळे केळी, कांद्याचे पीक जमीनदोस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.