Jalgaon Monsoon Season : आगामी 2 दिवस धुव्वाधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Monsoon Season : शहराला शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेचारच्या सुमारास धुव्वाधार पावसाने झोडपले. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते.
Men and women wading through stagnant water.Students making their way through the standing water in the square near Saraswati Dairy
Men and women wading through stagnant water.Students making their way through the standing water in the square near Saraswati Dairyesakal
Updated on

Jalgaon Monsoon Season : शहराला शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेचारच्या सुमारास धुव्वाधार पावसाने झोडपले. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. शहरासह जिल्ह्यात आगामी दोन दिवस ३ व ४ ऑगस्टला विजांचा कडकडाटासह धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. (rain for next 2 days Meteorological Department warns )

शुक्रवारी सकाळीही पावसाने जोरदार हजेरी लावली. नंतर पावसाने मोकळीक दिली. पुन्हा दुपारी साडेचार ते सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास धुव्वाधार पाऊस झाला. यामुळे गटारी तुबूंन रस्त्यावर पाणी आले. काही वेळेतच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नवीपेठ, टॉवर चौक, गांधी मार्केट, बंक स्ट्रीट या परिसरात गुडघाभर पाणी साचले. इतर ठिकाणच्या गटारीही भरभरून वाहत होत्या. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. (latest marathi news)

Men and women wading through stagnant water.Students making their way through the standing water in the square near Saraswati Dairy
Jalgaon Monsoon Season : जिल्ह्यात रिपरिपने जनजीवन विस्कळित; आतापर्यंत 58 टक्के पाऊस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.