Jalgaon Rain Update: निंबादेवी धरण झाले ‘ओव्हरफ्लो’! पर्यटकाना प्रवेशबंदी असूनही हौशी पर्यटकांची गर्दी

nimbadevi dam
nimbadevi damesakal
Updated on

Jalgaon Rain Update : तालुक्यातील सातपुडा पर्वतरागांच्या निसर्गरम्य परिसरातील निंबादेवी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असून प्रशासनाने तालुक्यातील सर्व पाणीसाठे असलेले क्षेत्र प्रतिबंधित केले आहेत.

तरी देखील हौशी पर्यटकांची अशा ठिकाणी सध्या गर्दी होत आहे. दरम्यान, या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Jalgaon Rain Update Nimbadevi Dam Overflow crowd of amateur tourists)

nimbadevi dam
Gram Swachhta Survey: ‘ग्राम स्वच्छता’ सर्वेक्षणास प्रारंभ! जिल्ह्यातील 3 उत्कृष्ट ग्रामपंचायतींची होणार निवड

गेल्या काही वर्षांत हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. कोरोना काळात तर या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.‌

तेव्हापासून हे प्रकाशझोतात आले. कधी हे धरण ओव्हरफ्लो होते, याची पर्यटक वाट पाहतात. दोन दिवसांपूर्वी हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरणावर होत असलेली गर्दी पाहता, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी हे क्षेत्र प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

तरीही प्रशासनाची नजर चुकवून काही हौशी तरूण येथे येत असतात. अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे पोलिस निरीक्षक राकेश मागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, उपनिरीक्षक अविनाश दहीफळे, पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन पोलिसानी केले आहे.

nimbadevi dam
Nashik News: सिडकोत घरात आढळली कोब्रा जातीची तब्बल 5 पिल्ले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.