Jalgaon Lok Sabha: जळगाव जिल्ह्यात तब्बल 2 दशकांनंतर केंद्रीय मंत्रिपद! याआधी एम के अण्णा होते मंत्री; रक्षा खडसेंना मिळाली संधी

Jalgaon News : रक्षा खडसे यांना खासदार म्हणून दोन टर्मचा अनुभव पाठिशी असून, श्‍वसूर तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मार्गदर्शन त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्य चालनासाठी प्रेरक ठरू शकेल.
Vijay Naval Patil, M. K. Anna Patil, Raksha Khadse
Vijay Naval Patil, M. K. Anna Patil, Raksha Khadseesakal

Jalgaon Lok Sabha : केंद्र सरकारमधील मंत्रिपदाबाबत दोन दशकांपासून वंचित राहिलेल्या जळगाव जिल्ह्याला अखेर २०२४ मध्ये ‘मोदी ३.०’ सरकारच्या मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळतेय. रक्षा खडसे यांना खासदार म्हणून दोन टर्मचा अनुभव पाठिशी असून, श्‍वसूर तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मार्गदर्शन त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्य चालनासाठी प्रेरक ठरू शकेल. (Jalgaon raksha khadse Union Minister post in district)

खानदेशात व जळगाव जिल्ह्यातही केंद्रीय मंत्रिपदे सातत्याने मिळाली आहेत. केंद्रात गेल्या तीन- चार दशकांत जळगाव जिल्ह्याला अभावानेच मंत्रिपदे मिळाली. तत्कालीन कॉंग्रेस सरकारमध्ये विजय नवल पाटील मंत्री होते. अर्थात, त्याआधी हरिभाऊ पाटसकर यांच्याकडे १९५५-५७ या काळात केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद होते. तर १७७७-७९ या काळातील सरकारमध्ये सोनूसिंग धनसिंग पाटील केंद्रात गृहराज्यमंत्री होते.

नंतर अटलजींच्या दोन्ही वेळेच्या सरकारमध्ये एम. के. अण्णा पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. १९९९ ते २००४ या काळात एम. के. अण्णांकडे केंद्रातील ग्रामीण विकास खात्याचे राज्यमंत्रिपद होते. २००६ मध्ये ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात एम. के. अण्णा बडतर्फ झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपदही गेले.

हरिभाऊ, ए.टी. पाटलांना होती संधी

२००७ मध्ये जळगाव मतदारसंघात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हरिभाऊ जावळे खासदार झाले. नंतर २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुनर्रचित रावेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. २०१४ ला त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, ती ऐनवेळी रद्द होऊन रक्षा खडसेंना मिळाली.

त्यामुळे जावळेंचे त्यावेळी असलेले केंद्रातील संभाव्य मंत्रिपद हुकले. २००९ व २०१४ असे सलग दोन टर्म जळगाव लोकसभेत जळगाव मतदारसंघातून खासदार असलेल्या ए. टी. पाटलांना २०१९ मध्ये उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे २०१९ ला त्यांचीही मंत्रिपदाची संधी हुकली. (latest marathi news)

Vijay Naval Patil, M. K. Anna Patil, Raksha Khadse
Lok Sabha Election 2024 : राज्यात 91 टक्के उमेदवारांची ‘अनामत’ जप्त; ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीसह सपचा समावेश

रक्षा खडसेंना संधी

२०१४, २०१९ व आता २०२४ असे सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना रावेर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि प्रत्येकवेळी त्या तीन लाखांच्या मताधिक्याने विजयीही झाल्या. त्यामुळे त्यांची लोकसभेतील ज्येष्ठता व गेल्या दहा वर्षांतील अनुभव लक्षात घेता, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. एम. के. अण्णा यांयानंतर तब्बल २० वर्षांनी जळगाव जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे.

उत्तर महाराष्ट्राला मंत्रिपद

यंदा उत्तर महाराष्ट्रात भाजप-महायुतीला सपाटून मार खावा लागला. या क्षेत्रातील आठपैकी सहा जागांवर महायुतीचा पराभव झाला. केवळ दोन ठिकाणी आणि त्याही जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले.

त्यातही रक्षा खडसेंची तिसरी टर्म आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मार्गदर्शन म्हणून मंत्रिपदी वर्णी लागण्यासाठी त्यांच्याकडेच ‘मेरीट’ होते, म्हणून उत्तर महाराष्ट्रातून त्या मंत्री झाल्या. २०१४ मध्ये धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, २०१९ ला दिंडोरीच्या डॉ. भारती पवार यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते. त्याआधी मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये नंदुरबारचे खासदार माणिकराव गावित केंद्रीय गृहराज्यमंत्री होते.

Vijay Naval Patil, M. K. Anna Patil, Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Result : पालकमंत्र्यांची रणनीती, भाजपची बूथ योजना अन राष्ट्रवादीची साथ यातूनच स्मिता वाघांना लीड!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com