Ramdev Wadi Accident Case : पुण्याचे ‘हिट’ जळगावचे ‘रन’! 15 दिवसांनंतर मुंबईतून दोघे संशयित ताब्यात!

Jalgaon News : पुण्यातील ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणात बिल्डरपुत्राने दोन अभियंत्यांचा जीव घेतल्यानंतर पुणेकरांनी रान पेटवलं, गृहमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले.
Accident
Accidentesakal
Updated on

जळगाव : रामदेववाडीजवळील वळणावर सुसाट इको स्पोर्ट्‌स कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेसह तीन बालके, अशा चौघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात करणारे बड्या राजकीय कुटुंबातील तरुण पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत होता.

मात्र, पुण्यातील ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणात बिल्डरपुत्राने दोन अभियंत्यांचा जीव घेतल्यानंतर पुणेकरांनी रान पेटवलं, गृहमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले. त्यानंतर मात्र रामदेववाडी अपघात प्रकरणातील गांभीर्य व जनदबाव लक्षात घेऊन अखेर १७ दिवसांनंतर दोन तरुणांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. (jalgaon Ramdev Wadi Accident Case Two suspects arrested)

जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडीजवळ पठारवाडीत आशासेविका राणी ऊर्फ वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय ३०) ७ मेस मुलांना घेऊन शिरसोलीकडे येत असताना, सुसाट इको स्पोर्ट्‌स कारने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात राणी चव्हाण यांच्यासह मुले सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७) यांचा मृत्यू झाला होता. भाचा लक्ष्मण नाईक (वय १६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पोलिस- ग्रामस्थ संघर्ष

राजकीय घराण्यातील तीन बड्या नेत्यांचे दिवट्यांचा यात समावेश आहे. त्यात शासकीय कंत्राटदार तथा मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे निकटवर्तीय अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल गाडी चालवत होता, तर जिल्‍हा बँकेचे चेअरमन तथा अजित पवार गटाचे संजय पवार यांचा मुलगा अखिलेश संजय पवार व धुव्र सोनवणे असे दोघे होते.

पोलिसांनी जमावाच्या तावडीतून अर्णव व अखिलेश याला वाचविल्यानंतर अखिलेशनेच डीवायएसपी गावित यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारपूस करताना माहिती दिली होती. मात्र, दोघा जखमींमध्ये गाडी चालवणाऱ्या तरुणाचे नाव आणि मिळालेल्या गांजाच्या पुड्यांचा उल्लेखच फिर्यादीत सोयीस्कररित्या टाळण्यात आला. ग्रामस्थांच्या मारहाणीत जखमी झाल्याने तातडीने अर्णव आणि अखिलेश यांना उपचारासाठी मुंबई हलविण्यात आले.

मतदानावर बहिष्कार

शिक्षण कमी, भटक्या स्वरूपाचा समाज मात्र गावकीत एकी प्रचंड. ७ मेस अपघात घडला. त्याच दिवशी पोलिस ठाण्यात मातब्बर राजकारण्यांची हजेरी, अपघातात मृत मूळ जामनेर तालुक्यातील असताना, संशयितांना वाचविण्यासाठी जामनेर, पहूर, जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा येथील मातब्बर पुढारी ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी चकरा मारत होते.

रामदेववाडी ग्रामस्थांनी त्यास थारा न देत आक्रमक पवित्रा घेऊन १३ मेस झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. तपास यंत्रणांनी या बाबीची दखल घेणे अपेक्षित असताना, रामदेववाडीकडे कुणाचे लक्षच गेले नाही. (latest marathi news)

Accident
Pune Porsche Accident: मुलगा नाही तर फॅमिली ड्रायव्हर पोर्शे चालवत होता; आरोपीच्या वडिलाचा दावा

‘थँक्यू’ पुणेकर

पुणे येथे पोर्शे कारचालकाने मध्यधुंद अवस्थेत धडक दिल्यानंतर एक तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्पवयीन बिल्डरपुत्र अग्रवाल याचे नाव समोर आले. हे प्रकरण दडपण्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले. न्यायालयाने अल्पवयीन संशयितास तीनशे शब्दांचा निंबध लिहण्याच्या सूचना करत जामिनावर सोडल्याने अस्सल पुणेकरांचे पित्तच खवळले. अख्यं पुणे न्यायाच्या बाजूने उभे ठाकले. मग काय गृहमंत्र्यांनीच दखल घेतली.

पुण्यानंतर जळगावला जाग

पुण्यात जनमाणसे संतप्त झाल्यानंतर त्याचे पडसाद जळगावातील घटनेसंदर्भातही उमटले. जळगावात मंत्र्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बडे नेतमंडळींकडून दबावाद्वारे प्रकरण दडपण्याचाच जास्त प्रयत्न झाला. मात्र, पुण्याच्या पोर्शे कार प्रकरणातून जळगाव पोलिसही खडबडून जागे झाले. प्रकरण हाताबाहेर जाण्याआधीच पोलिस दप्तरी एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली. गुन्ह्यातील संशयितांना अटकेसाठी पथक मुंबईला रवाना झाले.

दोघांना घेतले ताब्यात

अपघाताला कारणीभूत कारचालक अर्णव अभिषेक कौल, अखिलेश संजय पवार यांना एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेत रात्री जळगावला आणले. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी निरीक्षकांकडून काढून पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्याकडे सोपविला आहे.

"दाखल गुन्ह्यात एनडीपीएस ॲक्टची कलमे अगोदरच वाढविली असून, अपघाताला कारणीभूत कारचालकावर मुंबईत उपचार सुरू होते. त्याला गुरुवारी आमच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शुक्रवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे."

- डॉ. महेश्‍वर रेड्डी, पोलिस अधीक्षक, जळगाव

Accident
Kalyani Nagar Accident : पुण्यातील वातावरण गरम; पोलिस प्रशासन मात्र थंड

एकनाथ खडसेंचा उपोषणाचा इशारा अन्‌ पोलिस कामाला

रामदेववाडीजवळील अपघातात चौघा निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरही पोलिस यंत्रणा सुस्त होती. संशयितांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतरही यंत्रणेस जाग आली नव्हती. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत पोलिस महासंचालक श्रीमती रश्‍मी शुक्ला यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पोलिस कामाला लागले व संशयितांना मुंबईतून ताब्यात घेतले.

७ मेस रामदेववाडीजवळ हा अपघात घडला. घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांनी कारमधील तरुणांना मारहण केली. कारवर दगडफेकही झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर अनर्थ टळला. मात्र, त्यातील जखमी तरुणांना उपचारार्थ मुंबईत हलविले. संशयितांना जाणीवपूर्वक मुंबईला रवाना केल्याचा आरोप होत होता. संशयित जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींसह बड्यांची मुले असून, त्यांना वाचविण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचाही आरोप रामदेववाडी ग्रामस्थांनी केला होता.

पुण्यातही अशाच प्रकारचा अपघात घडल्यानंतर तो राज्यात गाजला. मात्र, रामदेववाडीत बळी गेलेल्यांच्या नातलगांना न्याय मिळत नव्हता. अखेरीस एकनाथ खडसेंनी या प्रकरणात लक्ष घातले आणि बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गृह विभागाच्या सचिवांनाही माहिती दिली. पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला यांना निवेदन देऊन सोमवार (ता. २७)पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. त्यानंतर गुरुवारी (ता. २३) पोलिसांनी संशयितांना मुंबईतून ताब्यात घेतले.

Accident
Pune Accident Viral Video : अल्पवयीन मुलाच्या आईची हात जोडून विनंती.. बनावट व्हायरल व्हिडिओचा उच्छाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.