अमळनेर : तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक व आटाळे या गावांतील शाळकरी मुले-मुली ही दररोज शाळेत ये-जा करतात. यावेळी अमळनेर आगारातील बसगाड्या पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत, असा गंभीर आरोप करीत आज बुधवारी (ता.२१) सकाळी पावणेदहाच्या सुमारास या तिन्ही गावांतील शाळकरी मुली-मुलांनी रास्तारोको आंदोलन केले. (Rasta Roko of students at Pimple Agitation to stop bus)