Jalgaon Banana News : केळी भावप्रश्‍नी बाजार समित्यांनी समन्वय साधावा : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon News : बोगस केळी व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, शेतकऱ्यांनी चक्राकार पद्धतीने केळीचे पीक घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी केले.
Collector Ayush Prasad while going to the farmers during the meeting of banana producers and understanding their problems.
Collector Ayush Prasad while going to the farmers during the meeting of banana producers and understanding their problems.esakal
Updated on

Jalgaon News : केळीचे भाव निश्चित करताना जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर व बऱ्हाणपूर येथील बाजार समित्यांनी समन्वय साधावा, व्यापाऱ्यांची बँक हमी घेऊन परवाना द्यावा, बोगस केळी व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, शेतकऱ्यांनी चक्राकार पद्धतीने केळीचे पीक घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. ३०) येथे केले. (Collector Prasad statement Banana price issue should be coordinated by market committees)

रावेर येथील बाजार समितीतर्फे माजी सैनिक सभागृहात झालेल्या केळी उत्पादक शेतकरी, केळी व्यापारी प्रतिनिधी आणि बाजार समितीचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत श्री. प्रसाद बोलत होते. मात्र या बैठकीत जाहीर लिलाव पद्धतीने केळी खरेदी विक्रीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. बाजार समितीतर्फे केळी लिलाव सुरू करण्याबाबत झालेल्या या बैठकीत सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने.

बऱ्हाणपूर बाजार समितीचे सचिव महेंद्रसिंह, रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केळीबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांकडून खरेदी विक्रीबाबत समस्या जाणून घेतल्या.

ते म्हणाले, की केळी पीकपद्धत चक्राकार पद्धतीने म्हणजे नियोजनपूर्वक लावावे, यासाठी तीन-चार वर्षे संघर्ष करावा लागेल, केळी पीक सिंगल प्रॉडक्ट न ठेवता मल्टिप्रॉडक्ट करण्यासाठी म्हणजे उपपदार्थ निर्मितीसाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा, रावेरसह जिल्ह्यातील बाजार समित्या व बऱ्हाणपूर बाजार समिती मिळून केळी भाव एक राहील यासाठी समन्वय ठेवावा, सर्व व्यापाऱ्यांची नोंदणी झाली पाहिजे, त्यासाठी बँक हमी महत्त्वपूर्ण आहे. (latest marathi news )

Collector Ayush Prasad while going to the farmers during the meeting of banana producers and understanding their problems.
Jalgaon Dam Water Storage : अनेर धरणाचे सर्व दरवाजे उघडले! धरण 58 टक्के भरले

केळीच्या नव्या बाजारपेठा शोधा

बोगस व्यापारी शोधून समित्यांनी अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तीन किलो कट्टीचा निर्णय समन्वयाने सोडवावा, व्यापारी व शेतकरी यांच्यात स्पर्धेचे वातावरण नसावे, दोघांनाही एकमेकाची गरज आहे, केळीचे भाव वाढण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीने नियोजन करण्याची गरज आहे. केळीच्या विविध प्रकारांची लागवड व्हावी, केळी विक्रीसाठी नव्या बाजारपेठा व नवे ग्राहक शोधावेत.

तीन टक्के कट्टी आकारू नये

नंदकिशोर महाजन म्हणाले, की शेतकऱ्यांनी केळी पिकाच्या दर्जाकडे लक्ष देऊन निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्याकडे भर द्यावा, सुरेश शिंदे यांनी केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अरविंद गांधी यांनी एकबिल पद्धत लागू करावी, छोटू पाटील यांनी व्यापाऱ्यांनी तीन टक्के कट्टी लावू नये, घेतल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी, असे सांगितले.

लिलाव पद्धत सुरू करावी

सुरेश धनके यांनी लिलाव पद्धत सुरू करण्याची मागणी केली. राजीव पाटील यांनी ८० टक्के केळी व्यापारी बोगस आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा व परवाना देताना समितीने बँक गॅरंटी घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. विशाल अग्रवाल म्हणाले, की केळीचे कंटेनर परदेशात पाठविताना व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय नसतो, याबाबत बाजार समितीने सहकार्य करावे, पाणंद रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Collector Ayush Prasad while going to the farmers during the meeting of banana producers and understanding their problems.
Jalgaon Server Down : रेशन धान्य वितरणात अडथळे! पारोळ्यात 39 टक्के लाभार्थी वंचित

माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद

पाटील, पीतांबर पाटील, योगीराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, प्रणीत महाजन, सुरेश पाटील यांनीही सूचना मांडल्या. कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, व्यापारी संजय अग्रवाल, नितीन पाटील, संतोष पाटील, रमेश वैदकर, विनोद पाटील, बाजार समिती संचालक डॉ. राजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, जयेश कुयटे, मंदार पाटील, सय्यद असगर, पद्माकर महाजन आदी उपस्थित होते. सभापती सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक नगरे यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

बैठकीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अगदी वेळेवर उपस्थित झाले. सुरवातीलाच बैठकीमागची भूमिका स्पष्ट केल्यावर त्यांनी थेट उपस्थित शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. केळी खरेदी विक्रीबाबतच्या त्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या.

केळी भावात स्थिरता येण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे नियोजन करावे लागणार असल्याचे सांगून त्यांनी या प्रकरणी आपण यापुढेही लक्ष घालणार असल्याचे सांगितले. सुमारे पंधरा-वीस वर्षांपूर्वी केळीचे भाव निश्चित करणारे येथील प्रसिद्ध केळी व्यापारी मनोहरलाल शर्मा यांची पद्धतच बिनतोड व सर्वमान्य असल्याचा उल्लेख जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी आणि वक्त्यांनी केला.

Collector Ayush Prasad while going to the farmers during the meeting of banana producers and understanding their problems.
Jalgaon News :...अन् दोन जोडप्यांचा पुन्हा फुलला संसार! अमळनेर येथील लोकअदालतीत 106 खटले निघाले निकाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.